वाचनाने मुलांचा बौद्धिक विकास होत असल्याने, वाचन संस्कृती जगवली पाहिजे”; राहुल पाटील

वाचनाने मुलांचा बौद्धिक विकास होत असल्याने, वाचन संस्कृती जगवली पाहिजे”; राहुल पाटीलपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पॅराडाईज किड्स केअर इंग्लिश स्कूलचे तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन थाटात संपन्न

प्रा तारका रूखमोडे, प्रतिनिधी गोंदिया

सौंदड/ गोंदिया: आधुनिक जगात माणसं बदलत चालली आहेत, परंपरा बदलत चाललेल्या आहेत, आपापसातील सुसंवादच संपत चाललेला आहे, एकंदरीत वाचन संस्कृती कुठेतरी हरवत चाललेली आहे. त्यामुळे मुले एकलकोंडी होऊन चुकीच्या मार्गावर जाऊन, निराशेच्या गर्तेत ओढली जात आहेत. यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी व सुप्त व कला गुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलनाची गरज भासत आहे. वाचनाने मुलांचा बौद्धिक विकास होतो म्हणून वाचन संस्कृती जगवली पाहिजे, ती विद्यार्थी मनात रुजवली गेली पाहिजे. वाचन संस्कृती जगवा, मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण द्या व त्याला इतर भाषांची जोड द्या. आज पॅराडाईजरुपी लावलेल्या रोपट्याचं वटवृक्षात नक्कीच रुपांतर होईल.असे प्रतिपादन मराठीचे शिलेदार संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष राहुल पाटील यांनी केले. ते पॅराडाईज किड्स केअर इंग्लिश स्कूल सौंदड येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते. त्यांच्या वैचारिक गवाक्षातून शाळेच्या प्रांगणात पडलेल्या प्रकाशमयी कवडस्यातून श्रोते मंत्रमुग्ध झाले.

गीताई बहुउद्देशीय विकास शिक्षण संस्था, द्वारा संचालित पॅराडाईज किड्स केअर इंग्लिश स्कूल सौंदडतर्फे तीन दिवसीय स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थापक संतोषजी राऊत यांच्या आयोजनाखाली ३० जानेवारीला या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन अगदी थाटामाटात, उद्घाटक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठीचे शिलेदार समूहाचे मुख्य प्रशासक,ज्येष्ठ संपादक, तथा अध्यक्ष बहुद्देशीय संस्था यांच्या अध्यक्षतेखाली, जयंत रामटेके आय.आय.टी मुंबई ,आय.आय.एम कलकत्ता, फाउंडर अँड डायरेक्टर मेरीटोरीयम नॉलेज अकॅडमी मुंबई , प्रशांत भुते ट्राफिक पोलीस इन्स्पेक्टर डुग्गीपार, विनोद जोकार पोलीस निरीक्षक डुग्गीपार, निशाताई तोडासे जिल्हा परिषद सदस्या, प्रा. राजकुमार भगत राजीव गांधी वरिष्ठ महाविद्यालय सडक अर्जुनी, प्रा.दयाराम आकरे, मंजू डोंगरवार, पत्रकार श्री.बबलूजी मारवाडे, हितेश डोंगरे इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या शानदार सोहळ्यात अध्यक्ष तथा प्रमुख अतिथी यांचे दिप ओवाळणीद्वारे प्रवेशद्वारावर बालगोपालांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. अतिथींच्या हस्ते भारतमाता, सावित्रीबाई फुले, म. गांधी व श्रद्धेय दि. ताराचंदजी राऊत यांच्या प्रतिमांचे पेजन करून माल्यार्पण करण्यात आले. सुंदर स्वागतगीताने व कथ्थक नृत्याने विद्यार्थीनींनी अतिथी तथा उपस्थितांचे मने जिंकून घेतली.

याप्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक जाहीर रीतीने करून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने व त्यांच्यातील कलागुणांना पुनश्च वाव देण्याच्या उद्देशाने संस्थेतर्फे माजी विद्यार्थ्याना या सोहळयात सत्कारमूर्ती म्हणून आमंत्रित केले गेले. डाॅ.सौम्या कृष्णमोहन चौधरी, मोहीत थालीराम झंझाड (इंजिनियर) व अभियंता पूजा दोनोडे यांचा अध्यक्ष राहुल पाटील व संस्थापक संतोष राऊत व इतर मान्यवर यांच्या हस्ते गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. हिमांशी राऊत,अर्णव गहाणे, खुशी कापगते ,श्राव्या दिपेवाड, ऐश्वर्या वाहने, कनिष्का मेश्राम या विद्यार्थिनींना जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाल्याबद्दल प्रमुख अतिथींच्या हस्ते तथा संस्थाध्यक्ष संतोषजी राऊत तथा सचिव राजश्री राऊत ह्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

संस्थेचे ध्येय तथा ध्येयवेड्या विद्यार्थ्यांचा स्फूर्तीदायी प्रवास व संमेलनाचा हेतू, तथा साधनेच्या या खडतर प्रवासात त्यांना करावे लागलेले परिश्रम व अनुभव आपल्या प्रास्ताविकातून संस्थाध्यक्ष संतोषजी राऊत यांनी मांडले. फाउंडर अँण्ड डायरेक्टर प्रा. जयंत रामटेके यांनी न्यू एज्युकेशन पाॅलिसीची व कौशल्यपूर्ण शिक्षणाची गरज तथा वैज्ञानिक दृष्टिकोनातून शिक्षणाची इन्व्हेस्टमेंट आपल्या भाषणातून सांगितली. इन्स्पेक्टर प्रशांत भुते, निशाताई, प्रा.आकरे, प्रा.भगत यांनीही विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले. डाॅ. सौम्या हिने मनोगत व्यक्त केले. अशाप्रकारे स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळा अगदी थाटामाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा. सौ. तारका रुखमोडे अर्जुनी/मोर.यांनी केले. व दर्शना डोंगरवार यांनी सर्वांचे आभार मानले.

दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुंदर सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. तिसऱ्या दिवशी गावातील सरपंच व वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत पदाधिकारी व नियोजित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विजय कोरे व प्रीती राजस यांनी केले. आभार प्राची श्रीवास्तव यांनी मानले. या कार्यक्रमाच्या साफल्यासाठी शाळेतील शिक्षिका सौ. खुशबू यावलकर, ज्योती नेवारे, उषा बिसेन, कांचन रंगारी यांनी परिश्रम घेतले. आयोजक संस्थाध्यक्ष श्री. संतोषजी राऊत व सचिव तथा प्राचार्या सौ. राजश्री राऊत यांच्या सुंदर नियोजनात तीन दिवशीय स्नेहसंमेलनाचे सोहळा संपन्न झाला.

शब्दांकन:
प्रा. तारका रूखमोडे, अर्जुनी मोर
मुख्य परीक्षक, लेखिका, कवयित्री व सहसंपादक
मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles