ऑर्गनवादक संजय देशपांडेंचा अमृतमहोत्सवी सोहळा

ऑर्गनवादक संजय देशपांडेंचा अमृतमहोत्सवी सोहळा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे

पुणे: येथील ज्येष्ठ ऑर्गनवादक संजय देशपांडे यांचा पंच्याहत्तरीनिमित्त आयोजित करण्यात आलेला सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. प्रसिध्द अभिनेता सुबोध भावे यांच्या हस्ते झालेल्या या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी माधुरी सहस्रबुद्धे होत्या. व्यासपीठावर स्वराज छोटा गंधर्व प्रतिष्ठानच्या अध्यक्ष चारूशीला केळकर, सुप्रसिद्ध गायक आनंद भाटे उपस्थित होते.

ऑर्गनवादक देशपांडे यांच्या वादन कारकीर्दीस ६० वर्षे पूर्ण झाले असून अद्यापही ते ऑर्गवादन सादर करतात. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘सूर अमृताचे’ हा त्यांचा ऑर्गन वादनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संजयजी यांची प्रकट मुलाखत प्रसिध्द अभिनेते रवींद्र खरे यांनी घेऊन सत्कारमूर्तीस बोलते केले.

माधुरीताईंच्या हस्ते सुबोध भावे व आनंद भाटे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी बोलताना सुबोध भावे यांनी गुरू संजय देशपांडे यांचेशी बालगंधर्व चित्रपटाच्या निमित्ताने झालेला स्नेह आणि त्यांचे सहकार्य याचा उल्लेख केला. अध्यक्षीय समारोपात बोलताना माधुरीताई म्हणाल्या,” कलेमध्ये रममाण होताना माणूस ध्यानमग्न, एकाग्र होतो. सगळ्या नकारात्मक गोष्टींचा त्याला विसर पडतो.कारण कला नेहमी आशावादाची जोपासना करतात, जगण्याचे खरे प्रयोजन मिळवून देतात, विशेषतः संगीतात तर मन प्रसन्न करण्याची खूप मोठी ताकद आहे.” असे प्रतिपादन करून त्यांनी ‘तरूण पिढीला संगीत नाटकांची गोडी लावण्याचे काम करणा-या “स्वरराज छोटा गंधर्व’ प्रतिष्ठानची प्रशंसा केली. प्रतिष्ठानच्या आशा करवंदे यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. सुचेता अवचट यांनी प्रास्ताविक केले. चारूशीला केळकर यांनी आभार मानले.

आनंद भाटे यांच्या शास्त्रीय गायनाच्या मैफलीने सोहळ्याची सांगता झाली. कार्यक्रमास सौ.भावना देशपांडे,श्री. अनिल व श्री. विष्णू देशपांडे हे कुटूंबिय, मित्र परिवार आणि शिष्यगण उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles