भंडारा-गोंदिया जिल्ह्यात होतकरू विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी आहे; डॉ. सोमदत्त करंजेकर

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात होतकरू विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी आहे; डॉ. सोमदत्त करंजेकर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

तालुका प्रतिनिधी, साकोली

साकोली: भंडारा गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा. कृषीधवल जिल्हे म्हणून या जिल्ह्यांची ओळख आहे. परंतु रोजगारांच्या बाबतीत हे जिल्हे मागे पडतात. जिल्ह्यात असंख्य तरुण उच्चशिक्षित आहेत मात्र ते मार्गदर्शनाअभावी मागे पडतात. हाच दृष्टिकोन समोर ठेवून भव्य, दिव्य महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था संस्थापक अध्यक्ष डॉ. ब्रह्मानंद करंजेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या मेळाव्याचे प्रासंगिक सुनियोजन करण्यात आले. आमच्या संस्थे अंतर्गत वेळोवेळी विविध उपक्रम घेतले जातात. आमचे विद्यार्थी देश-विदेशात स्थिरावले आहेत याचा सार्थ स्वाभिमान आम्हाला आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्याचा विचार आमची संस्था सातत्याने करीत आली आहे. हाच महारोजगार मेळावा आयोजित करण्यामागचा प्रामाणिक उद्देश. जिल्ह्यात होतकरू विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी असून त्यांची जिल्ह्यात वानवा नाही असे प्रतिपादन वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles