ओबीसी जनगणना संकल्प यात्रेचे ठाणा पेट्रोल पंप येथे भव्य स्वागत

ओबीसी जनगणना संकल्प यात्रेचे ठाणा पेट्रोल पंप येथे भव्य स्वागत



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जिल्हा प्रतिनिधी, भंडारा

जवाहरनगर (भंडारा:) वर्धा सेवाग्राम येथून 3 जानेवारीला निघालेल्या ओबीसी जनगणना संकल्प यात्रेचे आज भंडारा जिल्ह्यातील ठाणा – पेट्रोलपंप (जवाहरनगर) येथे भव्य स्वागत करण्यात आले.

विदर्भातील सात जिल्ह्यांमध्ये ही यात्रा जाणार असून ओबीसी सेवा संघ, ओबीसी जनगणना परिषद, ओबीसी जागृती मंच आणि विविध ओबीसी संघटनांच्या माध्यमातून या यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. बिहार राज्या प्रमाणे महाराष्ट्रात ओबीसी एन टी, एस बी सी यांची जात निहाय जनगणना झाली पाहिजे, जिल्हा निहाय 200 ओबीसी विद्यार्थ्यांची क्षमता असलेले 72 वस्तीगृह सुरू झाले पाहिजे. ते करण्याचे आश्वासन वारंवार देण्यात आले मात्र सरकारने आपला शब्द पाळलेला नाही यासाठी विविध संघटनांनी ही संकल्प यात्रा काढलेली आहे.

सरकार ओबीसींच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याची भावना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.सरकारला याची जाणीव करून देणे आणि जन माणसांमध्ये त्यांच्या अधिकाराप्रती जागृती आणणे हा एकमेव उद्देश घेऊन ही यात्रा निघालेली आहे अशी माहिती ओबीसी सेवा संघाचे गोपाल देशमुख यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles