हसारा येथील जुगार अड्डयावर धाड

हसारा येथील जुगार अड्डयावर धाड



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

एसडीपीओ पथकाची कारवाई ; सात जणांना घेतले ताब्यात

तालुका प्रतिनिधी, तुमसर

तुमसर :- येथील शहरापासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या हसारा टोली येथे शनिवारी ता.३ फेब्रुवारी ला नंदू मिताराम बर्वेकर यांच्या घरी ताश पत्तीवर पैशाची बाजी लावून हारजितीचा जुगार सुरु असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली असता आय पी एस रस्मिता राव यांच्यासह त्यांच्या पथकानी बर्वेकर यांच्या घरी सुरु असलेल्या जुगार अड्डयावर शनिवारी दुपारी ५ वाजता च्या दरम्यान धाड टाकून सात जणांना अटक करण्यात आली असून आरोपीच्या अंगझडतीत ३१ हजार ९२० रुपयांचा मुद्दे माल जप्त केला.

नंदू मिताराम बर्वेकर (५०)बलराम हरिदास पिलगर (२५) सचिन रामदास आगासे वय (३२)प्रशांत गुलाब मेश्राम (३२) युवराज जयपाल सहारे (४०) मनोज श्यामदास बरेकर (४९)चतुरश्याम नंदराम राणे (४८)सर्व आरोपी राहणार हसारा टोली अशे जुगाऱ्यांची नावे आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात तुमसर पोलिसांत विविध कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles