रोजगारासाठी जनता चालली परराज्यात!

रोजगारासाठी जनता चालली परराज्यात!



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_लाखनी तालुक्याच्या ग्रामीण भागातील भिषण वास्तव_

तालुका प्रतिनीधी, लाखनी

पालांदूर(चौ):लाखनी तालुक्यातील जनतेचे एकमेव उत्पन्नाचे व रोजगाराचे साधन शेती असून,प्रमुख पीक धानपिक आहे.शेतीच्या पेरणीपासून ते उत्पन्न हातात येईपर्यंत चार महिने हाताला रोजगार असतो.मात्र,एकदा शेतीतून धानाचे उत्पन्न निघाले की नंतर मात्र आठ महिने हाताला रोजगार नसल्याने तालुक्यातील ग्रामीण जनता दुसऱ्या राज्यात मिरची काढणे,कापूस वेचणे व विविध प्रकारच्या कामांतून रोजगार मिळविण्यासाठी पलायन करत आहेत.परिणामी,तालुक्यातील अनेक खेडी ओस पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

प्रशासनाकडून रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यात रोजगार मिळवून देण्याची योजना आहे.या योजनेंतर्गत वर्षभरातून किमान शंभर दिवस रोजगार देणे अपेक्षित आहे.
परंतू अद्याप रोजगार हमीची कामे देखील सूरु करण्यात आलेली नाही. लाखनी तालुक्यात रब्बी पीक घेण्यासाठी मुबलक पाण्याची उपलब्धता आहे.परंतु सोयी सुविधांच्या अभावामुळे व अपुऱ्या विद्युत उपलब्धतेमुळे तालुक्यातील शेतकरी रब्बी उत्पादनापासून वंचितच आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles