निरागस प्रेम..

निरागस प्रेम..पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुलाच्या लग्नासाठी महिनाभर शाळेत रजा घेतली. त्याच काळात शाळेत स्नेह संमेलन झाले. शिक्षकांना training आले. मुले खूप त्रास देऊ लागली.शिक्षक संख्या कमी होती. त्यात मुलं आपली, आपले शिक्षक नसले की अक्षरशः उधळतात.महिनाभराने मी शाळेत रुजू झाले. चौथीचा वर्ग पाच दिवसांसाठी देण्यात आला. माझे पालक विचारून जायचे. ” बाई, आपल्या वर्गावर या, मुले तुमची वाट पाहत आहेत. ”

माझी छोटी पाहिलीतील मुले चटकन यायची कमरेला विळखा घालायची. बाई चला आपल्या वर्गात म्हणायची.. छान चित्र काढायची मला गिफ्ट करायची.असे हे निरागस प्रेम न कळतच मिळते. ते कायम मिळते. मी चौथीवर पाच दिवसच गेले पण मला भरभरून प्रेम दिले या मुलांनी. माझ्यासाठी ग्रीटिंग बनवले. मला गिफ्ट केले. काय असे केले मी वेगळे, काहीच नाही हा पण त्यांच्या मनात मात्र मी उतरले, बाईंचा मुलांना आदर वाटू लागला.मुले सहज म्हणू लागली, “बाई खूप छान शिकवता, खूप प्रेमाने बोलता, नवीन शिकायला मिळाले आम्हांला…”

आज एक मुलगी आली माझ्या हातात एक छोटे पाकीट देत म्हणाली ” बाई, हे फक्त तुमच्यासाठी, मला तुम्ही खूप आवडला.” आणि अगदी माझ्या कुशीत शिरली. मी म्हटले “काय आहे बेटा?” ती म्हणाली “बाई तुमच्यासाठी माझ्या खाऊच्या पैशातून चॉकलेट आणलेत.” मी म्हटले “अग तुम्ही मैत्रणी खा, मी नाही खात ” ती लगेचच बोलली ” “तुमच्या वर्गातील मुलांना दया ” मला तिचे खूप कौतुक वाटले. एवढीशी ही आठ वर्षाची चिमुरडी किती समज आहे हिला. पुढे ती म्हणाली “बाई, मला तर वाटतंय तुम्ही आम्हांला खूप वर्ष शिकवताय. तुमचे प्रेम, शिस्त, तुमचे शिकवणे खूप आवडले. हेच ते निरागस प्रेम. या पेक्षा आपल्या कामाची पावती अजून काय असू शकते. आपल्या कामाचे मूल्यमापन या छोट्या मुलांनी अचूक केले. याचे मिळाले सुख कोणत्या पारड्यात मोजता येत नाही.

निरागस प्रेमाची ही पावती
मनी खोलवर रुजली
शिक्षक, विध्यार्थी नाती
सरस्वती मंदिरात बहरली…

वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा -पुणे.
========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles