स्नेहसंमेलननाने विद्यार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली

पंचशील विद्यालयाच्या स्नेहसंमेलनाने विद्यार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झालीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गोंदिया जिल्हा प्रतिनिधी (बिनधास्त न्यूज वृत्तसेवा)

बाराभाटी : स्थानिकच्या पंचशील विद्यालय बाराभाटी येथे विद्यार्थ्यांच्या सुप्त कुलागुणांना वाव देण्यासाठी दिनांक 25 जानेवारी ते 27 जानेवारी असे तीन दिवशीय स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. उद्घाटक माध्यमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, अध्यक्ष मिलिंद रामटेके, संस्थेचे सचिव अशोक रामटेके, साहित्यिक प्रभू राजगडकर, प्रमुख पाहुणे दादा राऊत, सुभाष मेश्राम, सरस्वताबाई चाकाटे यांनी थोर महापुरुषांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित व पुष्पमाला अर्पण करून या तीन दिवसीय कार्यक्रमाचे रीतसर उद्घाटन केले. उपस्थित सर्व पाहुण्यांचा लेझीम व कवायतच्या माध्यमातून सन्मान करण्यात आला. तसेच पुष्पगुच्छ व स्वागत गीतांनी पाहुण्यांचा स्वागत केल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक व्ही एम चव्हाण प्रास्ताविक भाषण केले.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण करण्यासाठी शाळेत राबविल्या जाणाऱ्या नव उपक्रमाची जाणीव उपस्थितांना करून दिली. विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडून राबविण्यात येणारा ‘पंचसूत्री कार्यक्रम’ व महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येणारा ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियाना अंतर्गत सर्व उपक्रम यशस्वी करण्याकरिता व विद्यार्थी हित लक्षात घेत शाळेतील सर्व शिक्षक तत्परतेने, उत्साहाने काम करीत असून यासाठी अहोरात्र मेहनत घेत असल्याचे सांगितले.

प्रास्ताविक भाषणानंतर गोंदिया जिल्ह्याचे कार्यतत्पर व उपक्रमशील शिक्षणाधिकारी म्हणून कादर शेख यांचा शाळेच्या वतीने संस्थेचे सचिव व सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अभ्यासाची आवड, जिद्द, चिकाटी व प्रबळ इच्छाशक्ती या जोरावर आपण सर्व प्रकारच्या समस्या व परिस्थितीवर मात करून स्वतःचे उज्वल भविष्य घडवू शकतो असे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी विद्यार्थ्यांना भाषणातून सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता उपक्रमशील शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक अभ्यासाच्या बाबतीत विद्यार्थ्यातील उणीवा तसेच त्यांच्या अंगी असणारे सूक्त कला गुण याचा अभ्यास करून नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. याकरिता परिसरातील सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना पूर्ण विश्वासाने या शाळेत पाठवावे अशी इच्छा दर्शवली. देशाचे उज्वल भविष्य घडविणयासाठी व आपल्या गरिबीतून मुक्त होण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं शस्त्र म्हणजे शिक्षण याची जाणीव ठेऊन मुख्याध्यापक चव्हाण यांच्या नेतृत्वात शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत आहे, हे काही महिन्यातच शाळेत झालेल्या बदलातून दिसून येतो असे संस्थेचे सदस्य सुभाष मेश्राम यांनी सांगितले.

विद्यार्थी व शिक्षकांच्या आचरणाकडे पाहता या शाळेत शिस्त व संस्काराला महत्त्व असल्याचे साहित्यिक प्रभू राजगडकर यांनी आपल्या भाषणातून सांगितले. तीन दिवसीय स्नेहसंमेलन उद्घाटनिय कार्यक्रमाचे संचालन सांस्कृतिक प्रमुख टी के भेंडारकर व डी एस भैसारे तर आभार शाळेतील सहाय्यक शिक्षक ए डी घानोडे यांनी केले.

तीन दिवसीय स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळ्यानंतर ‘रंग इंद्रधनुचे’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे माजी मुख्याध्यापक एम जी मेश्राम, जि प सदस्य किशोरभाऊ तरोणे, ओमप्रकाश नशीने, पोलीस पाटील हेमलताबाई खोब्रागडे, भीमराव चर्जे, शाळेचे सेवानिवृत्त लिपिक आनंद रामटेके, कुंभीटोला माजी सरपंच मोरेश्वर सौंदरकर, शाळेचे मुख्याध्यापक व्ही एम चव्हाण तसेच पालक शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक व्ही एम चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य गण बाराभाटी तसेच कुंभीटोला, शाळा व्यवस्थापन, पालक शिक्षक, माता पालक समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य गण आणि समस्त गावातील व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व पालक वृंद उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर देशभक्ती जागृती करिता कुंभीटोला व बाराभाटी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. या दरम्यान दोन्ही ग्रामपंचायत व आदिवासी विविध कार्यकारी संस्था कुंभीटोला येथील ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर ‘रंग इंद्रधनुचे’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर भारत लाडे, कविता कापगते, शालिनी डोंगरवार, एम जी मेश्राम, अमरदास कांबळे, हेमराज बेलखोडे, सौ संगीता कोडापे व शाळेचे मुख्याध्यापक व्ही एम चव्हाण यांच्या उपस्थितीत झाले. तीन दिवसीय स्नेहसंमेलना निमित्य आयोजित ‘रंग इंद्रधनुचे’ या सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधनात्मक अशा पद्धतीचे नृत्य व नाट्य कलेचे प्रदर्शन करीत सर्व प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षक एस सी पुस्तोडे, एन पी समर्थ, जे एम दोनाडकर यांनी उत्कृष्टपणे पार पाडले.

स्नेहसंमेलनाच्या तिसऱ्या दिवशी माजी विद्यार्थी सत्कार व भव्य बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे माजी विद्यार्थी सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव श्री श्याम तागडे, उद्घाटक आमदार मनोहर चंद्रिकापुरे, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव अशोक रामटेके, अध्यक्ष मिलिंद रामटेके, सदस्य धम्मदीप रामटेके व सौ उज्वला रामटेके, विदर्भ शिक्षक संघ प्रांतीय अध्यक्ष रेशीमजी कापगते, केंद्रप्रमुख सुरेंद्र भैसारे, आयसेप्ट कॅम्पुटर एज्युकेशन चेे संचालक भूपेंद्र बिसेन, लोकमत प्रतिनिधी व आंबेडकरवादी साहित्यिक व विचारवंत प्रा. मुन्नाभाई नंदागवळी, माजी मुख्याध्यापक एम एम राखडे व एम जी मेश्राम, विश्लेष नशीने व शाळेचे मुख्याध्यापक व्ही एम चव्हाण यांनी थोर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाला अर्पण करून तीन दोन्ही कार्यक्रमाचे संयुक्तरित्या उद्घाटन केले.

पाहुण्यांच्या स्वागतानंतर या शाळेत शिक्षण घेऊन सर्व दूर शाळा व परिसराचे नाव उज्वल करणाऱ्या अशा उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचे सन्मानचिन्ह देऊन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. याप्रसंगी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांनी सुरू केलेल्या ‘आता एकच ध्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास’ या अभियाना अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमासाठी प्रत्येकांनी आपापल्या परीने मदत शाळेला दिले. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता केवळ माजी विद्यार्थ्यांचा सन्मान व्हावा ज्या दृष्टीने आयोजित माजी विद्यार्थी सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी व काही प्रतिष्ठित मान्यवरांनी शाळा व विद्यार्थी हित लक्षात घेता दिलेल्या निधीबद्दल शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले. मिळालेल्या निधीचा दुरुपयोग न होऊ देता आपल्या परिसरातील गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या तयारी करिता लवकरच नियोजन करून एक भव्य डिजिटल अभ्यासिका वर्ग उभारण्यात येईल अशी हमी दिली.

माजी विद्यार्थ्यांच्या सत्कार नंतर सर्व विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वर्षभर राबविले जाणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धा तसेच स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले क्रीडा महोत्सव यामधील प्राविण्य प्राप्त विद्यार्थी व इयत्ता दहावी मार्च 2023 शालांत परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध बक्षिसे, सन्मानचिन्ह, मेडल देऊन गुणगौरव व कौतुक करण्यात आले. सोबतच शाळेला दान देणाऱ्या दानवीरांचा व वेळोवेळी आयोजित मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शकाला सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे शाळेतील प्रत्येक उपक्रमाची बातमी नियमित प्रकाशित करणारे लोकमत प्रतिनिधी व परिसरात आपल्या विचारांनी अनेकांच्या जीवनात प्रकाश पेरणारे अशा व्यक्तिमतवाचा म्हणजे मुन्नाभाई नंदागवळी यांचे संस्थेचे सचिव यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

माजी विद्यार्थी सत्कार व भव्य बक्षीस वितरण सोहळ्याचे संचालन शाळेतील सहाय्यक शिक्षक डी एच मेश्राम, ए डी घानोडे, क्रीडा प्रमुख आर डी कोल्हारे व प्रदीप ढवळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार सांस्कृतिक प्रमुख टी के भेंडारकर यांनी मानले. वंदे मातरमनी कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम संपल्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित माजी विद्यार्थी, सर्व निमंत्रित मान्यवर पाहुणे मंडळी व शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. अशाप्रकारे तीन दिवसीय स्नेहसंमेलनाचा थाटामाटात समारोप झाला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles