कोंबडा बाजारावर धाड ; दोघांना रंगेहात पकडले

कोंबडा बाजारावर धाड ; दोघांना रंगेहात पकडले



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

लाखांदूर पोलिसांनी केली कारवाई

तालुका प्रतिनिधी, लाखांदूर
(बिनधास्त न्यूज वृत्तसेवा)

लाखांदूर : दुपारच्या सुमारास स्थानिक स्मशानभूमी परिसरातील खुल्या मैदानात अवैधरित्या कोंबड बाजाराचे आयोजन करून पैशाच्या हार जितची बाजी लावल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोघांना रंगेहात पकडल्याची घटना घडली. ही घटना ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास तालुक्यातील विरली खुर्द येथील स्मशानभूमी परिसरात घडली. या घटनेत स्थानिक लाखांदूर पोलिसांनी तालुक्यातील नांदेड येथील किशोर आनंदराव बावनकर (३) व ईटान येथील प्रमोद बिसन मेश्राम (३४) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रानुसार, घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास घटनेतील आरोपींसह अन्य काही नागरिकांनी स्थानिक विरली खुर्द येथील स्मशानभूमी परिसरातील खुल्या मैदानात अवैधरित्या कोंबड बाजाराचे आयोजन केले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना देण्यात आली होती. माहितीवरून लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार गोपाल कोसरे, विलास मातेरे व निलेश चव्हाण आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी कोंबड बाजारावर धाड टाकली.

यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनेतील दोन्ही आरोपींकडून १ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार सचिन पवार यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles