पालांदुरात सिमेंट रस्त्यावरून उडणाऱ्या धुळ व तनस मिश्रित कचऱ्याने ग्रामस्थ त्रस्त

पालांदुरात सिमेंट रस्त्यावरून उडणाऱ्या धुळ व तनस मिश्रित कचऱ्याने ग्रामस्थ त्रस्त



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_धुळीचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी_

तालुका प्रतिनिधी, बिनधास्त न्यूज

पालांदुर(चौ.): येथील बाजार चौकातील मुख्य प्रवेशद्वार ते गोकुळ कृषी केंद्र पर्यंत नव्यानेच निर्माण केलेल्या ९०० मीटर लांबीच्या सिमेंट रस्त्याचे काम नुकतेच आटोपले असून सद्या रस्त्यावर तणस अंथरलेली असून त्यावर पाणी टाकण्याचे काम सकाळ-सायंकाळ केले जाते.मात्र मागील काही दिवसांपासून पाणी टाकणे बंद असल्याने या रस्त्यावर अंथरलेली तणस वाळून तिचे रूपांतर धुळीत झाले असून रस्त्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असुन या रस्त्यावरुन येणारे प्रवासी,शाळेचे विद्यार्थी,या मार्गावरील राहणारे निवासी, दुकानदार व शेतकरी यांना उडणाऱ्या धुळीचा व तणस मिश्रित कचऱ्याचा जिवघेणा सामना करावा लागत आहे.

याकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधींसह बांधकाम विभाग जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.या रस्त्यावर नेहमी अवजड वाहनांची ये-जा असते त्यामुळे या अवजड वाहनांच्या मागे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत यांचा प्रचंड त्रास येथील नागरिकांना व संबंधित ग्रामस्थांना करावा लागत आहे.

या धुळीमुळे नागरीकांना मोकळा श्वास पण घेता येत नाही अनेकांना श्वासाचे व त्वचेचे आजार पण उद्भवत आहेत.हा रस्ता मुख्य रस्ता असल्याने या रस्त्याने रहदारी जास्त आहे. त्यामुळे धुळीचाही त्रास होत आहे.या रस्त्यावर दररोज दोन वेळेस पाणी टाकावे व रस्त्यावरील धुळ व तणस मिश्रित कचऱ्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.

प्रतिक्रिया जाणून घ्या

रस्त्यावरुन एखादे वाहन गेल्यास उडणाऱ्या तणस मिश्रित धुळीने संपुर्ण अंगावर खाज सूटते. श्वासाचे आजारदेखील बळावले आहेत.संबंधीत विभागाने या समस्येचा तात्काळ बंदोबस्त करावा.”

नरेंद्र खंडाईत
सामाजिक कार्यकर्ता
पालांदूर(चौ.)

“रस्त्यावरील धुळीची समस्या तात्काळ मार्गी लावण्याकरिता संबंधितांना आदेश देण्यात येईल.”

शैलेश हरकंडे
कनिष्ठ अभियंता
प्रधान मंत्री ग्राम सडक योजना
भंडारा.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles