शिक्षक व लोकसहभागातून पुयार जि.प. शाळेचा कायापालट.

शिक्षक व लोकसहभागातून पुयार जि.प. शाळेचा कार्यापालट.पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_शैक्षणिक व भौतिक सुविधांवर भर : दान मिळालेल्या जागेवर परसबाग_

तालुका प्रतिनिधी, लाखांदूर (बिनधास्त न्यूज)

लाखांदूर: ‘गावकरी ते राव न करी’ या म्हणीचा परिचय लाखांदूर तालुक्यातील पूयार येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत नुकताच आला. शाळेचा कायापालट करण्याचा ध्यास बाळगून गावकरी झपाटून कामाला लागले. शिक्षकांनीही यात मोलाचा हातभार लावला. अन् बघता बघता १५ दिवसात शाळेचा कायापालट झाला. शाळा बोलकी झाली. विद्यार्थ्यांचे पाय आता शाळेत पडताच त्यांच्या तोंडातून ‘शाळा आमची आहे किती छान, आम्ही रोज शाळेला येणार… असेच शब्द बाहेर पडताना दिसत आहे.

लोकसहभाग व व शिक्षकांच्या परिश्रमाची किमया पूयार गावातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेने अनुभवली आहे. पूर्वीच्या जुनाट व भग्नावस्थेतील शाळेला आता वैभव प्राप्त झाले आहे. शाळेने सुंदर व देखणे रूप प्राप्त केले आहे. ही शाळा आता गावकऱ्यांसमवेत अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. शासनाच्या ३० नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयाप्रमाणे पूयार शाळा ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या स्पर्धेमध्ये सहभागी झाली आहे. उपक्रमातील शासन निर्णयानुसार सर्व मुद्द्यांवर शाळेने लक्ष पुरविले आहे. संपूर्ण शाळेची व वर्गाची रंगरंगोटी करून वर्ग सजावट करण्यात आली आहे. शाळेच्या आवारात व परसबागेत पर्यावरण पूरक झाडे व फुल झाडांची लागवड करण्यात आली आहे. संरक्षक भिंतीवर प्रबोधनात्मक चित्रे, सुविचार काढून भिंती बोलक्या झाल्या आहेत. शाळेत मंत्रिमंडळ नेमून विद्यार्थीच सर्व उपक्रम हाताळतात. गावातील विश्वनाथ कापगते यांचे वडील पंढरी कापगते यांनी दिलेल्या दानाच्या जागेवर परसबाग फुलविण्यात आली आहे. शाळेचा परिसर यामुळे सुशोभित झालेला आहे.

_अन् शाळेने टाकली कात.._

पूयार शाळेला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सर्वप्रथम शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती, पालक व नागरिकांची सभा बोलवण्यात आली. या सभेत ठरल्यानुसार आपली शाळा स्पर्धेत उतरवायची, असे सर्वानुमते ठरले. गावातून लोकवर्गणी काढली गेली. शिक्षकांनीही खारीचा वाटा उचलला. अन् पाहता पाहता पंधरा दिवसात शाळेने कात टाकली. शाळेचा संपूर्ण चेहरामोहरा बदलला गेला.

जिल्हा परिषदच्या शाळा इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या तुलनेत कुठेही मागे राहू नये, भौतिक सुविधांसोबत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, या हेतूने शासनाकडून अनेक उपक्रम राबविले जात आहे. पूयार येथील शाळेचा लोकसभागातून झालेला कायापालट निश्चितच प्रेरणादायी असाच आहे.

_रवींद्र सोनटक्के, प्राथमिक शिक्षणाधिकारी, भंडारा._

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles