“काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गावा-गावात जाऊन पक्षाची विचारधारा पोहचवावी” ; नाना पटोले

“काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गावा-गावात जाऊन पक्षाची विचारधारा पोहचवावी” ; नाना पटोलेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जिल्हा प्रतिनिधी,भंडारा

भंडारा: भंडारा-पवनी विधानसभा मतदारसंघाच्या बूथ कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन भंडारा येथील साई मंदिर मंगल कार्यालय येथे करण्यात आले होती. या मेळाव्यास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांनी उपस्थित राहून बूथ पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले.

महाराष्ट्रात सध्या महागाई, बेरोजगारी, सरकारी नोकर भरतीमधील घोटाळे, महिला सुरक्षा, वाढती गुन्हेगारी, शेतकरी आत्महत्या या ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष वळविण्यासाठी मराठा-ओबीसी वाद पेटवून शिंदे-फडणवीस राजकीय पोळी भाजत आहेत असा घणाघात नाना पटोले यांनी केला.केंद्रातील मोदी सरकार लोकशाही व सविंधान विरोधी आहे हे आपण नेहमी त्यांच्या कृतीतून पाहत आहोत,देशातील सर्वसामान्य जनतेला महागाई व तरुणांना बेरोजगारी मध्ये केंद्र व राज्य सरकारने झोकून दिला आहे,भारतातील मीडिया ही केंद्र सरकारच्या दबावाखाली असल्यामुळे ते सत्यता जनतेपर्यंत पोहचविनार नाही म्हणून तुम्ही लोक हा संदेश भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी तत्पर रहा असा आदेश यावेळी त्यांनी दिला.

ते पुढे म्हणाले, की पक्ष हा प्रत्येक बुथवर मजबूत असणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले पाहिजेत, काँग्रेस पक्ष हा देशाला दिशा देऊ शकणारा पक्ष आहे. येत्या निवडणुकांच्या तयारीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने तयारीला लागावे आणि स्थानिक पातळीवर पक्ष संघटना वाढीस संपूर्ण ताकदीने प्रयत्न करावे,काँग्रेस पक्षाची विचारधारा प्रत्येक गावात पोहचवावी असे यावेळी ते बोलत होते.

_यावेळी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आ.नानाभाऊ पटोले यांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून ३ वर्षाची यशस्वी वाटचाल पूर्ण केल्याबद्दल स्मृतिचिन्ह,शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला._

यावेळी प्रदेश महासचिव जियाभाई पटेल, माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.मोहनभाई पंचभाई, जिल्हा परिषद सभापती रमेश पारधी,सभापती मदन रामटेके,माजी अध्यक्ष प्रेमसागर गणवीर,महिला अध्यक्षा सौ.जयश्रीताई बोरकर,विधानसभा समन्वयक सुभाष आजबले, युवक काँग्रेसचे अध्यक्ष पवन वंजारी,जिल्हा महासचिव धनंजय तिरपुडे,तालुका अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे,शहर अध्यक्ष प्रशांत देशकर, ऍड.शफीभाई लद्धानी,रामलाल चौधरी,धनराज साठवणे,अभिजित वंजारी, मनोज बागडे,आवेश पटेल,राजकपूर राऊत, गटनेता शमीम शेख,शिवाभाऊ गायधने,जिल्हा परिषद सदस्य प्रेमभाऊ वणवे,गायत्री वाघमारे,अनिता भुरे,कविता उईके,संगीता नवघरे,संगीता बोरकर,पूजा हजारे,मंगेश हूमने व भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्राचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles