गोविंद प्राथमिक विद्यालयात हीरक महोत्सवी स्नेहसंमेलन

गोविंद प्राथमिक विद्यालयात हीरक महोत्सवी स्नेहसंमेलन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

तालुका प्रतिनिधी, पालांदूर (बिनधास्त न्यूज वृत्तसेवा)

पालांदूर चौ.: लाखनी तालुक्यातील गोविंद प्राथमिक व गोविंद कॉन्व्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने हीरक महोत्सवी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन पं.स.लाखनीचे माजी विस्तार अधिकारी तेजराम टिचकुले यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सदस्य शि.ला.राहांगडाले, प्राध्यापक विनोद तिजारे, प्राचार्य गोवर्धन शेंडे, माजी विद्यार्थी डॉक्टर प्रशांत पडोळे,से.नि.मुख्याध्यापक नारायण थेर , मुख्याध्यापक अंबादास धकाते,इंदिरा जांभुळकर व गिरीश रहांगडाले उपस्थित होते.

सर्व प्रथम पाहुण्यांच्या हस्ते कला प्रदर्शनी, प्रतिकृती प्रदर्शनी व विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात शारदा माता, गोविंदराव लाखनीकर,व शिक्षण महर्षी स्व.बापुसाहेब लाखनीकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.विदयार्थांनी पाहुण्यासमोर लेझीम,डंबेल्स व नृत्य सादर केले.

डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी विद्यार्थ्यांना शुद्ध जल मिळावा यासाठी आरो प्लांट देण्याचे कबूल केले.त्याचबरोबर शाळेच्या वतीने सर्व देणगी दारांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सं.सदस्य शि.ल.राहंगडाले यांना ७५वर्ष पुर्ण झाल्याने त्यांचा शाळेतील शिक्षकांनी ७५दीप प्रज्वलित करून वाढदिवस साजरा केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अंबादास धकाते यांनी तर सूत्रसंचालन अश्विनी कांबळे हिने व आभार प्रदर्शन किशोर खंडाईत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अंबादास धकाते , ज्ञानेश्वर लुटे,ललीत पटले, अश्विनी कांबळे,शेख,कान्व्हेट विभागातील वैशाली शिवणकर,मंजुषा नंदूरकर, इंदिरा जांभुळकर, ममता भेदे, लक्ष्मी मुटकूरे,सौ.जाभुळकर यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles