“कधी आलेच अश्रू डोळ्यात तर अलगद मी टिपेन..”; स्वाती मराडे

“कधी आलेच अश्रू डोळ्यात तर अलगद मी टिपेन..”; स्वाती मराडेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेचे परीक्षण

प्रेमात असताना सगळं जगच गुलाबी भासतं. ज्याच्यावर जीव जडला तो सतत सोबत असावा असं वाटतं. त्याने काही म्हणायचा अवकाश ती इच्छा पूर्ण करण्यासाठी होणारी धडपड किती प्रेम व्यक्त करून जाते ना.. ती प्रिय व्यक्ती दूर गेली तर वाटणारी व्याकुळता, लागणारी ओढ सगळंच कसं हवंहवंसं वाटतं. त्या प्रिय व्यक्तीचं‌ रूसणं,फुगणंही लोभस वाटतं. दोष तर केवळ नजरेआड केले जातात.. पण हे सगळं लग्नानंतर हरवतं का? लग्नगाठ बांधल्यानंतर होणारं दोन मनांचं रेशीमबंधन लग्नाची बेडी कधी आणि कशी होते?

कदाचित विवाहाबरोबरच काही कर्तव्य व जबाबदाऱ्या अंगावर येतात. प्रेमात असताना स्वप्नमयी दुनियेतील प्रेमींना वास्तवाची जाणीव होते नि सुरू होते तू तू मैं मैं.. सप्तपदी ही तप्तपदी भासायला लागते. खरेतर विवाह म्हणजे केवळ औपचारिक सोपस्कार नसून महान संस्कार आहेत. सुखदु:खात एकमेकांची साथ, वडिलधाऱ्यांचा सन्मान, आयुष्यभराची सोबत, कर्तव्य यांची जाणीव करून देणारा सोहळा. पण हे सोहळे भपकेबाज इव्हेंट होऊ पाहताहेत. केवळ दिखावा. पण त्याचबरोबर समजदारपणाही तितक्याच ताकदीने आचरणात आणला तर मनोहारी रेशीमबंधन हे बेडी वाटणार नाही.

उगाच कसेतरी निस्तरणे किंवा एक घाव दोन तुकडे घालून काडीमोड घेणे म्हणजे लग्न नव्हे… आईवडील आप्त परिवार या सर्वांच्या पसंतीने होणारी निवड आणि सनईचौघडयाच्या मंगलमय सुरात माथ्यावर अक्षता उधळण करत अग्नीसाक्षीने होणारे शिक्कामोर्तब. नाजूक नात्याची ही वीण जन्मोजन्मी अभंग अखंड ठेवण्याची बांधिलकी प्राणपणाने जपणारे हे बंधन.

मी कायम तुझ्यासोबत राहीन हे केवळ बोलून न दाखवता प्रसंगी कृतीतून ते दाखवता आलं पाहिजे. माझी आवड जपताना तुझीही आवड जपेन. कधी आलेच अश्रू डोळ्यात तर अलगद मी टिपेन.. तू सांभाळशील संसार मी तुला सांभाळून घेईन.. तुझ्यावरचं भाळणं तुला जन्मभर दिसेल.. कधी होईल त्रागा, कधी मी रूसेन.. पण आलंच काही संकट तर सावरायला मी असेन..होय हवेसे वाटणारे हे बंधन मी अगदी प्रेमाने जपेन. हात हाती घेऊन तुझा, चढेन लग्नवेदी..अन् हा वाटत असेल कुणा गुन्हा तर हसत हसत स्विकारेन ही लग्नाची बेडी..!

आज चित्र चारोळी स्पर्धेसाठी आलेले चित्र म्हणजे ‘लग्नाची बेडी’. आपणा सर्वांच्या काव्यनजरेतून वाचताना आलेले विचार मी शब्दबद्ध केले. विवाह संस्कारावर रचनेतून झालेले शब्दसंस्कार अगदी मनोहर, वास्तवाची जाणीव करून देणारे व मार्मिक टिप्पणी करणारेही. असेच लिहित रहा या शुभेच्छेसह सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन..! आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.🙏

सौ स्वाती मराडे
इंदापूर, पुणे
मुख्य परीक्षक,सहप्रशासक,कवयित्री,लेखिका
मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles