जगन्नाथ शंकरशेट जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम

जगन्नाथ शंकरशेट जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी

पुणे: थोर समाजसुधारक जगन्नाथ शंकरशेट यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीने राजा केळकर संग्रहालय येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

केळकर संग्रहालयाच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात संग्रहालयाचे संचालक सुधन्व रानडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.प्राचार्य श्याम भुर्के प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. प्रा.भुर्के यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना शंकरशेट यांनी महाराष्ट्रात शिक्षणाचा पाया रचला हे सांगून त्यांच्या पुढाकाराने सरस्वस्ती विद्यालय, एल्फिस्टन काॅलेज, मुंबई विद्यापीठ या नामवंत शैक्षणिक संस्थांची स्थापना झाली असल्याची माहिती दिली.

तसेच भारतीय रेल्वे, राणीची बाग ई. विविध संस्था व संग्रहालये त्यांनीच सुरु केली असून स्. शंकरशेट हे समाज सुधारणा आणि देशभक्ती याचा सुरेख संगम असणारे व्यक्तीमत्वं होते, असे प्रतिपादन केले. शंकरशेट यांच्या महान कार्याची दखल घेऊन ‘मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानका”ला त्यांचे नाव देण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली. कार्यक्रमात दीपक करंदीकर, कुमार आणवेकर्, व्यंकटेश जोगळेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सौ गीता भुर्के यांनी आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles