शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट अकरा🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : साहित्यसेवा☄*
*🍂शनिवार : १० / ०२ /२०२४*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*साहित्यसेवा*

साहित्य पंढरीची
मी असे वारकरी
साहित्य सेवेचे
ब्रीद मम अंतरी

या माय मराठीचा
गाजे डंका त्रिभुवनी
तिची महती पाहून
गेले मीच मोहूनी

अवलिया तो थोर
अवचित भेटलासे
पंखांत माझ्या बळ
त्यानेच भरले ऐसे

दुःखाचा पडे विसर
खुणावीतसे आनंद
साहित्याच्या फुलांत
शोधू लागले मरंद

साहित्य क्षितीजी
घेतलीसे मी झेप
प्रतिभा अंतरीची
बहरली आपोआप

लेखणीच्या संगतीने
भाव शब्दांत गुंफले
साहित्याचे प्रांगण
नाना रुपे बहरले

शिलेदार समूहाने
दिला मायेचा आधार
दुःख दूर करूनी
खुले साहित्य व्दार

साहित्याची शत रुपे
पैलूदार लोलकल्याली
कथा काव्य ओव्यांसह
लावणी लावण्यल्याली

माय मराठी संवर्धना
हातभार लावण्याचे
भाग्य लाभू दे मज
शारदेच्या पूजनाचे

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️📘✍️➿➿➿➿
*साहित्य सेवा*

शिकत असता तेव्हा
एक प्रश्न मनात येई
गद्यपद्य वाचन त्यास
खुशी कम आनंद देई

मात्रुभाषेत प्रेम होता
वाचन अन् लिखाणावर
कठीण वाटत असली
तरी जीव मायबोलीवर

मराठीत तो वरपास
कित्येक वेळा झाला
पण तिच्यावर प्रेम मात्र
त्याने मनापासून केला

ध्यानीमनी नसताना…
लिखाण करत राहिला
बघता बघता मराठीचे
शिलेदार समुहात आला

निमंत्रित कवी म्हणून
आमंत्रण स्वीकारला
चार-पाच वेळा गेला
साहित्य संमेलनाला..!

काना मात्रा आजही..
कळत नाहीत बुध्दूला
तरीसुद्धा पट्ठा आवडीने
साहित्यसेवा करु लागला

*✍🏻चंदू डोंगरवार अर्जुनी मोर*
सदस्य मराठीचे शिलेदार समुह
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️📘✍️➿➿➿➿
*साहित्यसेवा*

शब्दवृक्षांचे आम्ही पुजक
नित्यनेमाने करतो साधना
साहित्यसेवा घडावी हातून
नवागतांची उत्स्फुर्त भावना

कथा पटकथा अन् कविता
गझल चारोळी ती कादंबरी
साहित्याच्या मांदियाळीत
नाटके ग्रंथ त्रिवेणी बखरी

माय मराठी मातृभाषेचा
मांडू गौरव साहित्यातून
बोलीभाषा आपुलकीची
दाखवुया नित्य कृतीतून

साहित्यसेवेच्या दिंडीचे
होऊ आम्हीपण वारकरी
मायमराठीच्या संवर्धनाची
घेऊन पताका खांद्यावरी

नवागतांचे जत्थे उगवती
मराठी शिलेदार समूहात
कल्पनाशक्तीला वाव मिळे
सोबतीला कौतुकांची साथ

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️📘✍️➿➿➿➿
*सन्मानपत्र हवे असल्यास कृपया इच्छुक विजेत्यांनीच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*साहित्यसेवा*

लाभला प्रत्येकांना
वारसा साहित्य सेवेचा
मराठीचे जतन करून
तिचे जतन करण्याचा

साहित्यातून घडतो जिवन
वाचन लिखाणात रमतो मन
नव्या कल्पनांना फुटतो फाटा
ज्ञान संपादनाचे मिळतात वाटा

मराठीला सक्षम बनविण्यासाठी
अहोरात्र करतात साहित्य सेवा
तिला मिळावा मानाचा दर्जा
यात गैर समज नसावा

साहित्य ज्ञानाचा केंद्र बिंदू
ज्ञानाला करतो विकसित
कल्पनांच्या दुनियेत रमून
मृदू पण येतो त्यांच्या वाणीत

ज्ञान सिंधू भागिरथी
अजूनही आहेत ज्ञानी महारथी
साहित्य सेवेत आहेत रमून
त्याला पुजतात हृदयातून

नावा रुपाला येतात कवी
साहित्याची करून सेवा
नवोदितांचा जमतो जमआवळआ
त्यांनाही वाटतो सेवेचा हेवा

साहित्य सेवा अनमोल सेवा
मातृभाषा माय मराठी
सांभाळून ठेवतात हृदयात
तिचे जतन करण्यासाठी

*केवलचंद शहारे*
सौंदड गोंदिया
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️📘✍️➿➿➿➿
*साहित्यसेवा*

माता,मातृभूमी अन्
घडावी साहित्य सेवा
मातृभाषेचेही ऋण
खरेच फिटेल तेंव्हा.. //

जननी जन्मभूमीने
प्रसविले अन् पोसले
तसेच मातृभाषेचे ही
ज्ञान अमृत प्राशिले.. //

बोल बोबडे असो की
असो प्रकांड पांडित्य
बोट धरूनी भाषेचेच
निर्मावे महान साहित्य.. //

लेखणीच्या चातुर्याची
येथे दाखवावी झलक
मातृभाषेच्या मस्तकी
लागो मानाचा तिलक… //

केवळ तुलाच मानवा
वाचा, बुद्धीचे वरदान
सार्थक करावे त्याचे
रोज लिहून एक पान.. //

येथे अनंत बोलीभाषा
घ्यावे तेवढे थोडे ज्ञान
पणास लागो कौशल्य
मातृभाषेस देण्या मान.. //

अजरामर व्हावी अशी
करावी साहित्य सेवा
विश्वातच व्हावा गौरव
परभाषेस वाटावा हेवा.. //

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️📘✍️➿➿➿➿
*साहित्य सेवा*

साहित्य सेवा हातून घडावी
कारणी लागावी जगाच्या
अपराध न व्हावा हातून काही
विचार करावा साऱ्यांच्या मनाचा||१||

लिहिण्यातून चुकेल असेल काही
माफ करावे मनातूनी
आपल्या हातून सत्कर्म घडावे
हेच मागणे मनोमनी ||२||

साहित्य सेवा घडवी
हातून माझ्या सदा
हेच मागणे तुला मागतो
या धरतीच्या दाता||३||

माता सरस्वती ठेव
डोई माझ्या हात
साहित्य सेवा करण्याला
सरसावे माझे हात ||४||

धन पैशाहुनी अनमोल
ज्ञानाची तिजोरी
साहित्याची सेवा करता
ज्ञानाने उजळेल धरणी||५||

वाचनाने यशाचे गाठता
येते शिखर
ज्ञान अमृताची धार
अज्ञान मनाचा होईल दूर||६||

साहित्याचा नकळत मला
लागला कसा छंद
शब्दांना आळविता
त्यास घालिते मी साद||७||

मी वाचन वेडी मी वाचन वेडी
मज वेड लागले वाचनाचे
शब्द खेळती डोळ्यापुढे
मनात खेळ चाले शब्दांचे||८||

शब्दांचा चालतो मनात
रात दिन खेळ
वेळ न काळ उरला
शब्दांचा होई मेळ||९||

*माया सतीश वांगीकर*
मु.पो.माळीवाडा
ता.पाथरी जि.परभणी
*©सदस्या- मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️📘✍️➿➿➿➿
*साहित्यसेवा”…..*

माझ्या आयुष्यात लाभला
मज असा अनमोल ठेवा
घडू लागली नकळत
माझ्या हाती साहित्यसेवा ||१||

साहित्यप्रेमी होतोच मी
रसास्वाद घेत राही
वाचनवेड जोपासले होते
अंतरंगात ठायी ठायी ||२||

कथा,कादंबरी,चरित्रे
मन यात रमून जाई
शब्दलालित्याचा प्रभाव
माझे मन मोहून घेई ||३||

आता लेखणीला हाती
घेऊया निश्चय मी केला
कागदावर अंतरीच्या शब्दांचा
मग वर्षाव सुरू झाला ||४||

शब्दप्रपंचात असा मी
अकस्मात ओढला गेलो
भावनांना अंतरीच्या मी
वाट दाखवीत गेलो ||५||

कवितेच्या प्रांगणात माझी
अशी सरसावली लेखणी
यमक रूपक अलंकार
यांची होऊ लागली आखणी ||६||

आता विसावा नाहीच
साहित्यप्रवास सुरू झाला
लेखणीने माझ्या सोडला
माझ्या मौनातील अबोला ||७||

कथा लेखनाचाही मोह
आता टाळू ना शकलो
कथानकाची सुसंगत मांडणी
करताना कधीही ना थकलो ||८||

साहित्यिकांच्या मांदियाळीत
नवोदित तारा हा चमकू दे
साहित्यविश्वाच्या प्रांतात देवा
जीव माझा असाच गुंतू दे ||९||

दिनरात माझ्या हाती घडो
ही अमौलिक साहित्यसेवा
मायमराठीच्या संवर्धनासाठी
अवघा जन्म माझा जावा ||१०||

*श्री.पांडुरंग एकनाथ घोलप*
*ता.कर्जत जि.रायगड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️📘✍️➿➿➿➿
*साहित्यसेवा*

घडो सेवा सदैव तत्पर
मातृभू मातृभाषेसाठी
ऋण फेडण्या मातृभाषेचे
लेखणी अखंड चालण्यासाठी

जन्मो काव्य कथा नी लेख
कादंबरी दिर्घ कथा नी नाटक
वाढवया उंची भाषेची
सज्ज व्हावे सारे साहित्यिक

सकल सहज सुंदर साहित्य
भाग्यात असो आमच्या सदा
खारीचा हा वाटा आमचा
ज्ञानज्योती फुलवावया

उंच शिखरावर शोभे राजभाषा
अभिमान सर्वां द्यावा घ्यावा
आमरण ही सदैव ईच्छा
घडो हातून साहित्यसेवा

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️📘✍️➿➿➿➿
*साहित्यसेवा*

साहित्यसेवा घडो सदोदित
चंग मनोमन मी बांधियला
याजसाठी अट्टहास करूनी
प्रयत्न सफल तो साधियला

मातृभाषा असे मायबोली
जिवनाचे द्वार सदैव खोली
असो कुणी नवखा परका
उमगते त्यास मराठी बोली

साहित्य प्रवासा सुरूवात
करेल जो कोणी मनातून
साहित्यसेवा घडेल त्याची
आपसूक त्याच्या वाणीतून

साहित्य विश्र्वात रमतांना
वाचन लेखन वृद्धिंगत होते
उलगडा विविध साहित्यात
अंगवळणी मग पडून जाते

साहित्याच्या महासागरात
साहित्यसिंधुत बिंदू पडावा
साहित्यसेवा भाग्य नशिबी
मज पामारास योग घडावा

याजसाठी प्रयत्न करतोय
वाचन लेखन छंद बाळगून
काव्यसंग्रह प्रकाशित करत
घडावी म्हणतो सेवा हातून

वसा घेतला साहित्यसेवेचा
तोच मनोभावे पेलतो आहे
मराठी भाषा गौरव दिनाला
साहित्य संमेलना येत आहे

*✍️बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️📘✍️➿➿➿➿
*साहित्य सेवा*

विचारांची ,भावनांची मशागत केली
अलंकारिक शब्दांचे खत घातले
अक्षरांची पेरणी छान केली
शब्दमालेत शब्द अचूक सजवले….

विश्वासाने समूहात रोप लावले
छंद जपला मनी कवितांचा
शब्दातच मन अडखळले
आनंद घेतला सुरेख चारोळींचा…,.

अक्षरपेरणीचे रोप वाढले
शब्दांचे घोस त्याला लागले
मराठी शिलेदार समूहात
मानाचे व्यासपीठ मिळाले….

शब्दांची कणसे भरघोस लागली
कवितांच्या रानी विखुरली
कणसातून काव्यमोती डोकावून
साहित्य सेवेत वसुधा रमली…..

परिश्रमांचे फळ मिळाले
सुवर्णाक्षरात लाहिले आज
“काव्यरत्न” पुरस्काराने आता
चढविला एक सुंरर साज…..

मा.राहूल सरांच्या कौतुकाने
भारावून जातेय वसुधा आज
सविता ताईंच्या शब्दसुमनाने
स्वतःवरच करतेय मी नाज…..

वैशाली ताईंची पाठीवर थाप
मनास देते हो खास आनंद
संग्राम सरांची कौतुकसुमने
मिळवून देतात मला स्वानंद करूनी
सातत्याने काव्यांगणात कविता फुलवूया…..

*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा – पुणे*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️📘✍️➿➿➿➿
*साहित्यसेवा*

माझ्या मराठीची बोलू कौतुके
परी अमृतातेही पैजा जिंके
ऐसि अक्षरे
मेळवीन….

ज्ञानाची ज्ञानेश्वरी वाचावी
मुखी सदोदित वदावी
मोरपंखी भाषेचा भास
सर्वांगावरून फिरल्याचा आभास….

शब्दशृंगारा च्या दुनियेत
शब्दाला सजवावं
विरंगुळ्याच्या क्षणांना
भावनिक होऊन उतरावावं…

शिलेदारांशी मैत्री झाली
लेखणी माझी थोड थोडकी बहरली
धकाधकीच्या या जीवनात
लिखाणाची आवड भरली नसा नसात.

मनी घेतला वसा
कर्म एकच साहित्यसेवा
कवी कवयित्रींचा सहवास
लाभावा नेहमीच या पामरास…..

*सचिन दत्ताराम माळी*
*माणगाव रायगड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️📘✍️➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles