रमणा मारोती युथ फाऊंडेशन तर्फे वर्षपूर्ती निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

रमणा मारोती युथ फाऊंडेशन तर्फे वर्षपूर्ती निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजनपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: ‘रमणा मारोती युथ फाउंडेशन’ ही नागपुरतील एक सामाजिक संस्था आहे. जी धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. नुकतेच संस्थेतर्फे वर्षपूर्ती निमित्त रक्तदान महादान या संकल्पनेला धरून रमणा मारोती मंदिर परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.गरजू रुग्णांपर्यंत सरळ मदत पोहचावी हाच उद्देश ठेवून सरकारी मेडिकल रक्तपेढी च्या चमूला बोलाविण्यात आले होते. शिबिरात जवळपास ५० युनिट रक्त संकलन करण्यात आले.

कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता क्षितिज इंगळे,शैलेश गोंनाडे,अक्षय इखारकर,लोकेश झुणके,आशिष उरकुंडे,गणेश राऊत,आसावरी शेंदरे,मनोज पाटील,श्रीकांत कळंबे,राहुल चितकांबले,हेमंत कडमधाड,स्वप्नील गभने,रितेश मुरोडीया,राहुल चाफले,सुमित चिचाळकर,अमरीश ठाकरे,रोशन वझे, अमित मोझरकर यांनी मेहनत घेतली

कार्यक्रमाचा समारोप विजय (पिंटु) झलके, माजी स्थायी समिती अध्यक्ष, परमेश्वरजी राऊत अध्यक्ष राष्ट्रीय ओ बी सी महासंघ व डॉ. सुमितजी पैडलवार यांच्या भाषणाने झाली. रमणा मारोती युथ फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रविणजी उरकुंडे यांनी कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles