विद्यार्थ्यांची ‘एनएमएमएस’ परीक्षेत गगनभरारी

विद्यार्थ्यांची ‘एनएमएमएस’ परीक्षेत गगनभरारीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

भंडारा:- राष्ट्रीय आर्थिक मागास शिष्यवृत्ती योजनेंतर्गत एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत बेलगाव येथील स्वामी विवेकानंद स्टडी सर्कलचे ५० पैकी ४० विद्यार्थी एनएमएमएस परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. सलग चौथ्या वर्षी विवेकानंद स्टडी सर्कलने निकालात गगनभरारी घेतली आहे.

शासनाच्या राष्ट्रीय आर्थिक मागास व दुर्बल घटकाअंतर्गत इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेंतर्गत एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा १ हजार रुपये असे वार्षिक १२ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती सलग ४ वर्षे दिली जात असल्याची माहिती स्टडी सर्कलच्या वतीने देण्यात आली.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय शिक्षक मंगेश बनपुरकर, शिक्षिका दर्शना सार्वे, प्राचार्य संजीव कुकडे, ओंकार शेंडे, विकास धरमशहारे, एस. पी. खोब्रागडे, हेमंत शेंडे, प्रशांत बोरकर, हिरालाल बाभरे यांना दिले आहे.

*_निकालाची परंपरा कायम_*

एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत सन २०२१ – २२ मध्ये २२ पैकी ११ व २०२२ – २३ मध्ये ३० पैकी १५ विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले होते. यावर्षी सन २०२३-२४ मध्ये ५० पैकी ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने स्वामी विवेकानंद स्टडी सर्कलने निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. उत्तीर्ण ४० विद्यार्थ्यांपैकी बेलगाव येथील कस्तुरबा गांधी विद्यालयातील ३७ तर अन्य शाळेतील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles