दहावी -बारावीच्या परीक्षेदरम्यान विभागीय व जिल्हा स्तरावर ‘हेल्पलाईन’

दहावी -बारावीच्या परीक्षेदरम्यान विभागीय व जिल्हा स्तरावर ‘हेल्पलाईन’पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_12वीसाठी 14 फेब्रुवारी पासून तर 10वीसाठी 22 फेब्रुवारी पासून सुरु होणार_

भंडारा दि. 14: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12वी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10वी) लेखी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे नागपूर विभाग व जिल्हास्तरावर समुपदेशन केंद्र व हेल्पलाईन सुरु होणार आहेत. 12वीसाठी समुपदेशन केंद्र व हेल्पलाईन आजपासून (14 फेब्रुवारी) सुरु झाली आहेत. तर 10वीसाठी 22 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने इयत्ता 12वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2024 दरम्यान होणार आहे. तर इयत्ता 10वीची लेखी परीक्षा 1 मार्च ते 26मार्च 2024 दरम्यान होणार आहे. या परीक्षांसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता परीक्षा वेळापत्रक, प्रवेशपत्र, विषय बदल, प्रात्यक्षिक परीक्षा व परिक्षेसंबंधी गोपनीय माहिती वगळून अन्य माहिती मिळविण्याकरिता नागपूर विभागीय मंडळाद्वारे या दोन्ही परिक्षांच्या कालावधी दरम्यान विभागीय व जिल्हास्तरावर सकाळी 8.00 ते सायंकाळी 8.00 वाजेपर्यंत ‘समुपदेशन केंद्र’ आणि ‘हेल्पलाईन’ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे, विभागीय सचिव चिंतामन वंजारी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे.

विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांसाठी विभागस्तरावर 12वीच्या परिक्षेसाठी संपर्क अधिकारी एस. एस. बुधे (मो.क्र. 9404339992), डी.बी.पाटील (मो.क्र. 7709157172), ए.बी.शेंडे(7020737434) आणि 10वीच्या परिक्षेकरिता संपर्क अधिकारी व्ही. आर. देशमुख (मो.क्र. 8830458109),पी.ए. कन्नमवार(9673163521) आणि एस.आर.अहीर(8308007613) यांच्याशी संपर्क साधता येणार आहे. तसेच विभागीय मंडळ कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक 0712-2553507 आणि 0712-2553503 वरही माहिती प्राप्त करता येणार आहे.

जिल्हा स्तरावरील समुपदेशन केंद्र व हेल्पलाईनशी संबंधित संपर्क अधिकाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे नागपूर जिल्ह्याकरिता विशाल गोस्वामी (शारदा महिला विद्यालय, ओमनगर नागपूर मो.क्र. 8275039252)आणि प्रतिमा मोरे (बालाजी हायस्कूल, हिंगणा रोड नागपूर मो.क्र.9028066633), वर्धा जिल्ह्यासाठी पी.के. शेकार (यशवंत विद्यालय, सेलू, ता.सेलू, जि.वर्धा मो.क्र.9766917338) आणि वि.दा.पाटील (इंदिरा हायस्कूल सायलीकला, ता. सेलू, जि.वर्धा, मो.क्र.9823438205), भंडारा जिल्ह्याकरिता गायत्री भुसारी (समर्थ विद्यालय, लाखनी,जि.भंडारा मो.क्र. 9011062355) आणि नरेंद्र चौधरी (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, ता.जि.भंडारा, मो.क्र. 9405517541), गोंदिया जिल्ह्यासाठी मिलींद रंगारी (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, ता.जि.गोंदिया, मो.क्र. 9404860735) आणि एल.एच. लांजेवार (श्री. गुरुदेव विद्यामंदिर, ता. देवरी,जि.गोंदिया मो.क्र 7507099136), चंद्रपूर जिल्ह्याकरिता सतीश पाटील (मातोश्री विद्यालय, तुकूम, जि. चंद्रपूर मो.क्र 9421914353) आणि आर.एन. रहाटे (मातोश्री विद्यालय, तुकूम, जि. चंद्रपूर मो.क्र 7588890187) आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी डी.एम.जवंजाळ (रेणुकाबाई उके हायस्कूल, शिवराजपूर, ता.देसाईगंज, जि. गडचिरोली मो.क्र. 9421817089) तसेच ए.एल. नुतिलकंठावार (लक्ष्मीबाई कन्या हायस्कूल, ता. कुरखेडा,जि.गडचिरोली मो.क्र.9421732956) आहेत. संबंधीत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी व पालकांनी आवश्यकतेनुसार या समुपदेशन केंद्रांची व हेल्पलाईनची सुविधा घ्यावी, असे नागपूर विभागीय मंडळाकडून कळविण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles