आस्थेच्या भेटी अन् भारावलेले क्षण

आस्थेच्या भेटी अन् भारावलेले क्षण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_खासदार सुनिल मेंढे रमले ग्रामीणांसोबत जुन्या आठवणीत_

रोजची दगदग, आलेल्या लोकांची गाऱ्हाणी ऐकत त्यांचे केलेले समाधान,अशा सततच्या व्यस्ततेतून खा मेंढे गावात रमले…लोकांची सुख दुःख जाणून घेतली. त्यांच्या सोबत पंगतीला बसले, विद्यार्थ्यांमध्ये रमून बालपण अनुभवले आणि शेतात राबणाऱ्या मजुरांच्याही वेदना जाणून घेतल्या. गाव चलो अभियानात खासदारांनी मागच्या काही तासात जे अनुभवले कदाचित ते, विलक्षण होते. भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर गाव चलो अभियान राबविले जात आहे.

आमदार असो किंवा खासदार. पक्षाचा कोणताही पदाधिकारी असो किंवा कार्यकर्ता. सगळ्यांना गावागावात जाऊन, एक दिवस गावात मुक्काम करून लोकांचे सुख दुःख जाणून घ्यावयाचे आहेत. सातत्याने लोकसंपर्कात राहून लोकांच्या अडचणी समजून घेणाऱ्या खासदारांनीही या अभियानांतर्गत साकोली तालुक्यातील सुकळी हे गाव गाठले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गावातील खासदारांचे वास्तव्य तसे सर्वांसाठीच कौतुकाचे होते. संध्याकाळी खासदार गावात पोहोचले. काही पक्ष कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांच्या घरी त्यांनी भेटी दिल्या. कुठे चहाचा आग्रह तर कुठे जरासं खाऊन जाण्याचा हट्ट.

या सर्वांच्या आग्रहाचा आदर करीत खासदारांनी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. असलेल्या व्यथा समजून घेत शक्य असेल तिथे तोडगाही काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. संध्याकाळी ओट्यावर बसून ग्रामस्थांशी गप्पा झाल्या. एका सामान्य कुटुंबात बसून रात्रीचे जेवण झाले. खासदार आपल्या घरी निवासाला आहे या विचाराने हा कार्यकर्ता भारावून गेला होता.

आजची सकाळ ही लोकांची विचारपूस करीत झाली. गावाचा फेरफटका मारताना सहज कुठेतरी चहा घेतला. भेटीगाठी घेतल्यानंतर अधिकाऱ्यांना गावात बोलून लोकांच्या व्यथा त्यांच्यापुढे मांडून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. शाळेच्या पटांगणात एकत्रित झालेल्या विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारताना खासदार आपल्या बालपणात रमलेले दिसले. जुन्या आठवणी आठवून त्याची विद्यार्थ्यांशी देवाण घेवाण करताना वातावरण भारावून गेले होते. शेतातील मजूर वर्गालाही ते शेतात जाऊन भेटले. त्याच्या ही अडचणी ऐकल्या.

आपल्या धकाधकीच्या जीवनात काही क्षण काढून ग्रामिणांचे दुःख ऐकून घेणारे खासदार लोकांच्या मनात घर करून गेले. शेवटी आपण निवडून दिलेला आपला लोकप्रतिनिधी आस्थेने आपली विचारपूस करीत आहे म्हंटल्यावर तो क्षण नक्कीच प्रत्येकासाठी अप्रूप असेलच ना !

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles