शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेतील निवडक रचना

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : अजूनही तिथेच मी☄*
*🍂शनिवार : १७ / ०२ /२०२४*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*अजूनही तिथेच मी*

अजूनही तिथेच मी, ना भंगली माझी समाधी
हाच ” तो ” वेडा प्रेमवीर, लागली हीच उपाधी.. //

अढळ अचल असा मी, जसा नभात ध्रुव तारा
अटळ माझा फैसला, जरी सरला जन्म सारा.. //

तू फिरून मागे यावे, हा नसेच माझा अट्टाहास
पाहशील तूही दूरून, किती प्रखर माझी आस..//

नव्हते केवळ वरवरचे, माझे होते आतून गुंतणे
नसे दिस,मास,साल, तुझ्यात जन्म होते गुंफणे..//

माझ्या लेखी एक तूच तू , आद्य आणि अंत ही
आजन्म उरी सलेल, तुझ्या प्रतारणेची खंत ही.. //

दिली घेतली वचनेही, मलाच आता निभावणे
भंगलेल्या स्वप्नावशेषात, कायमचेच विसावणे.. //

सुकतील पापण किनारे, अश्रूंचे ओघळून पाट
मिटतील अखेर नेत्र , पाहता पाहता तुझी वाट..//

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️❤️✍️➿➿➿➿
*अजूनही तिथेच मी*

काळाच्या पडद्याआड झालास तू..
तुझ्या वेदनांच्या आठवणी घेऊन
अजूनही तिथेच मी…||

ॲंम्बुलन्सचा तो क्षण तुझे विव्हळणे..
मात्र तीव्र जगण्याची इच्छाशक्ती..
मान्य नव्हते देवशक्तीला..||

सलाईनचे बाॅटल फुटणे
वारंवार ते लावणे
संकेत मजला देत होते
तू संपण्याचे…||

मृत्यूच्या दारात जाताना
पाण्याचा घोट मागताना
हातात हात दे म्हणतांना
अश्रूच्या धारा वाहतांना…||

वेड्या मनाला सांभाळत
अहो तुम्हाला नाही जाऊ देणार सोडून…
नजरेला नजर बघा लावून..||

मी वेडी ऑक्सिजनच्या मशीनकडे बघतच…
मात्र तुम्ही माझ्याकडे बघत
कधी जगाचा निरोप घेतला…||

आठवते ते नेत्र तुमचे बघताना…
आक्रोश मनाचा कसा थांबवू
आठवणीत त्या अजूनही तिथेच मी…||

*रंजना राहुल ब्राह्मणकर*
*अर्जुनी/मोर, गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️❤️✍️➿➿➿➿
*अजूनही तिथेच मी*

असा कसा रे निसर्गा तू
माझ्यावरच होता कोपला
माझ्याच बाबतीत का तू
नशेत तल्लीन झोपला….

असा कसा रे निसर्गा तू
वाट माझी अडवला
शितल छाया देणाऱ्यालाच
पाया खाली तुडवला…..

किती छान होते ते दिवस
सभोवताली आनंदाचे क्षण
सौदामिनीच्या रागाने मात्र
भाजून निघाले माझे तन….

क्षणात रान उध्वस्त झाल
कसा रे स्वतःला आवरू
भावना झाल्या अनावर अन्
अश्रुंचा बांध कसा सावरू…..

कधी ना कुणाचे वाईट चिंतले
अंगा खांद्यावर सर्वांना खेळवले
मातृत्वाचा हात हिरावून
सांग कोणते पुण्य तु मिळवले…

करता करता सारेंचे
जरी जळालो उभा असा
तरी आठवणीत सर्वांच्या
ठेवून जाईल आनंदाचा वसा…..

अजूनही तिथेच मी
वाट तुझी पाहते आहे
घेऊन ये आनंदाचे क्षण
दारात उंबरठ्यावर बसली आहे…

*सारिका डी गेडाम, चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿✍️❤️✍️➿➿➿➿
*सन्मानपत्र हवे असल्यास कृपया इच्छुक विजेत्यांनीच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*अजून ही तिथेच मी*

ऐक ना सखी तुझी वाट पाहणं
अजूनही नाही थांबलं
हे वेडसर मन मात्र
तुझ्या विना नाही स्थिरावलं…

दाही दिशा आसमंती पाहिलं
मन हे माझ सैरा वैरा
आड वाटेला धावलं
शेवटी आसवांच्या गर्दीत विसावलं…

जाणवतंय मला
तुझ्या विना नाही जगणे
आभागी हा देह झाला
जगणे माझे झालेय हे व्यर्थ….

होईल का ग भेट आपली
जिथे फुलली प्रेमाची पाकळी
देतो प्रेमाची मी हमी
ये ना अजून ही तिथेच मी….

तू माझी मी तुझा
घेतलाय विरहाचा मी धडा
विसरलो नाहीय काहीच
ये ना ग बोल माझ्याशी घळघळा…

*सचिन दत्ताराम माळी*
*माणगाव् रायगड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️❤️✍️➿➿➿➿
*अजूनही तिथेच मी*

स्वप्न साकार करेन
हीच मनी संकल्पना
काटेरी वळणावरी
मज वाट सापडेना.

रूसव्याच्या माळरानात
रुक्षतेचे निवडूंग उगवेल
नासमज या वाटेवर
कळून कधीतरी यावे.

आयुष्याच्या क्षेत्रात
खेळ अनेक मांडलेले
आनंदात खेळलो नाही
ते सर्व मागेच राहिले.

आकाशी झेप घेऊन
उडावे वाटे पक्षी होऊन
पंखात नसे बळ
अजूनही तिथेच मी.

*अर्चना राजू ईंकने*
लाखांदूर जिल्हा भंडारा
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️❤️✍️➿➿➿➿
*अजूनही तिथेच मी”….*

भेट आपली पहिली झाली
उभा अजूनही तिथेच मी
वाट पाहूनी थकलो जरी
तू येशील विश्वास ठेवतो मी

काळजात जपलो आजवर
तुझ्यामाझ्या प्रेमाची आठवण
कळणार कधी सांग तुला
माझ्या भावनांची गोठवण

म्हणाली होतीस तूही
तुच आयुष्याचा साथीदार
नशीब माझे थोर मिळाला
मला मनासारखा जोडीदार

माझे प्रेम स्विकारून
आता कुठे दूर गेलीस
शोधू कुठे सांग तुला
का अवहेलना केलीस

विसरलीस सार्‍या आणाभाका
आणि घेतलेल्या त्या शपथा
कसा सावरू आता स्वतःस
चिघळल्या हृदयाच्या व्यथा

किती पाहू वाट तुझी
डोळ्यात आसवांची धार
झुरत राहिलो मी फक्त
तू का घेतलीस माघार

तीच जागा,तोच मी
पण कुठे आहे तीच तू
आस तुझी,भास तुझा
कळू लागला तुझा हेतू

अजूनही तिथेच मी
भांबावलेली माझी नजर
सोडल्या सार्‍या अपेक्षा
तरी वाट पाहण्यास आतूर

*श्री.पांडुरंग एकनाथ घोलप*
*ता.कर्जत जि.रायगड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️❤️✍️➿➿➿➿
*अजूनही तिथेच मी*

अजूनही तिथेच मी
तू मला न पाहिले
मन वेडे हे माझे
मी तुलाच वाहिले

अजूनही तिथेच मी
स्पर्श तो हवा हवा
झोंबतो अंगास या
थंड गुलाबी गारवा

अजूनही तिथेच मी
स्वप्न नगरी सजविते
हात हाती गुंफून तुझा
रोज झुल्यावर झुलते

अजूनही तिथेच मी
रंगमहाल सजविते
गोड गोड शब्दांत ज्या
तू मनास मोहवितो

अजूनही तिथेच मी
संदेश मनीचा धाडला
क्षणभर तरी तू सख्या
असशिल स्तब्ध उभारला

अजूनही तिथेच मी
ऐकण्या आतूर पावले
शांत नयनामध्ये तुला
जपून आहे ठेवले

अजूनही तिथेच मी
ना कोणती तक्रार इथे
वाट पाहण्याचा आनंद
तुझ्या नशिबी आहे कुठे
अजूनही तिथेच मी…..

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️❤️✍️➿➿➿➿
*अजूनही तिथेच मी*

अजूनही तिथेच मी
पाऊल खुणा शोधते,
येशील मज भेटाया
वाट तुझी मी पाहते…

जडला जीव तुजवरी
मनामधी प्रीत दाटली,
प्रेम कहाणी आपली
का अर्ध्यावर राहीली…

ध्यास तुझा रे घेतला
तुझ्यात जीव गुंतला,
क्षणभर ही तुजवीण
जीव कुठे ना रमला…

निस्वार्थी प्रेम माझेही
भावलेय तुज सजणा,
अवस्था दोही सारखी
करमेना तुज मजविना…

नाही विसरता येणार
घर केलंय तू हृदयात,
घुटमळत राहते सदा
तुझिया विचारचक्रात…

एका भेटीसाठी तुझ्या
आतूरलेले माझे नयन,
प्रेमपूर्वक पाहता तूज
गलबलून जाईल मन…

अजुनही तिथेच मला
वाटते भेटशील पुन्हा,
भास होई असल्याचा
का मन करतेय गुन्हा…

*✍️बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️❤️✍️➿➿➿➿
*अजूनही तिथेच मी*

तु दिलेल्या फुलांच्या
झाल्यात पाकळ्या तरी
अजुनही तिथेच मी
वाट बघत यमूना तीरी

अजूनही सुगंध आहे
तसाच बकुळीच्या फुला
वाळलेल्या सुक्ष्म कणात
मधूर गंधाचा झूला

अजूनही खोल डोहात
वसतो आठवांचा नाग
तू दिलेल्या जखमाही
झाल्यात आयुष्याचा भाग

अजूनही बावरी मी
वाट काट्याची तुडवते
फक्त तूझ्या भेटीसाठी
दुपारचा धुरळा उडवते

अजूनही काठावरील
कदंब कंच हिरवा आहे
पानापानांत स्पर्श धुंद
समीरही हरखून वाहे

*सविता धमगाये,नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️❤️✍️➿➿➿➿
*अजूनही तिथेच मी*

मी पुन्हा येणार कधीतरी
तु म्हणाली जाऊ द्या मला
विश्वास ठेवला तुझ्यावर
अन् समजून घेतलंय तुला

केलेला वादा निभवणार
याची खात्री होती मजला
पण नशीबच खोटं म्हणावं..
उगा अजमावत बसलो तुजला

ओसंडून जलधारा वाहती
अन् कोरडे मन असेच वसती
तसेच झाले माझ्या बाबतीत
तुझ्या आठवणीत जीव निघती

हिरावून नेलंय नशीबाने ते
आयुष्य वाट पाहण्यात गेले
नव्याने तुलाच शोधू लागलो
तव प्रेमास जीव हरपून गेले

आहे अजूनही तिथेच मी..
जिथून मजला सोडून गेली
जीवनाची या वाट लागली
येशील म्हणून आशा बाळगली

तुझी वाट बघत बसलोय
तू आली ना तुझा निरोप..
होतो तिथेच अजूनही आहे
का केलीस असा खटाटोप..?

ओंजळ हाती शब्द फुलांची
प्रतिक्षेत तुझ्या त्या प्रेमाच्या
आहे अजूनही तिथेच मी..
स्वागतासाठी तव येण्याच्या..!

*✍🏻चंदू डोंगरवार अर्जुनी मोर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿✍️❤️✍️➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles