जे. एस. एम. महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

जे. एस. एम. महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग: आज दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक १० वा. जे. एस. एम. महाविद्यालयात छत्रपती शिवाजी
महाराज यांची ३९४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसांगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील, मराठी विभाप्रमुख डॉ. नीळकंठ शेरे, ज्युनिअर कॉलेजचे पर्यवेक्षक श्री अजय सावंत, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, प्रा. अश्विनी आठवले तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व एन.
एस. एस. स्वयंसेवक उपस्थित होते.
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. गौतम पाटील यांनी सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

सर्वप्रथम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील व उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक व रा. से. यो. स्वयंसेवकानी आणलेल्या सात गडावरील पाण्याने अभिषेक
करण्यात आला. त्यानंतर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले व छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मसोहळा महाराजांच्या जयघोषाने उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील शिवजयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या व सर्व विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या आचरणात आणावेत असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु .प्रेक्षणी घरत हिने केले तर आभारप्रदर्शन डॉ. प्रविण गायकवाड यांनी
केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी डी प्रविण गायकवाड आणि प्रा अश्विनी आठवले आणि स्वयंसेवक यांनी प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles