जागतिक मराठी भाषा दिनी बुलढाण्यात होणार ‘जागर मराठीचा’

जागतिक मराठी भाषा दिनी बुलढाण्यात होणार ‘जागर मराठीचा’



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

‘मराठीचे शिलेदार संस्था’ व ‘यशवंतराव चव्हाण’ सेंटर यांचा संयुक्त उपक्रम

७ व्या राज्यस्तरीय कवी संमेलनात ९५ कवींची हजेरी; तर १४ कविता संग्रहाचे प्रकाशन

नागपूर: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर व यशवंतराव चव्हाण सेंटर, केंद्र बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागर मराठीचा’ हा कार्यक्रम ‘जागतिक मराठी भाषा गौरव दिनी’ अर्थात ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस मंगळवार, दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी दोन सत्रात ‘राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट इमारत’, ए. आर. डी. सिनेमा हॉलच्या मागे, मलकापूर रोड, बुलढाणा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे.

‘जागर मराठीचा’ या कार्यक्रमाचे अध्यक्ष: मा. आ. डॉ. राजेंद्रजी शिंगणे, माजी मंत्री व पालकमंत्री, बुलढाणा (म.रा.), स्वागताध्यक्ष: मा. राधेश्यामजी चांडक उपाख्य भाईजी, संस्थापक अध्यक्ष, बुलढाणा अर्बन, ‘जागर मराठीचा’ या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मा. नरेश शेळके, सचिव, यशवंतराव चव्हाण सेंटर बुलढाणा जिल्हा, प्रमुख अतिथी मा. रवींद्रजी इंगळे चावरेकर, साहित्यिक तथा भाषा संशोधक, प्रमुख अतिथी मा. रमेशजी इंगळे उत्रादकर साहित्यिक व कादंबरीकार, प्रमुख पाहुणे मा. डॉ. सौ. संगीताताई काळणे पवार, सहसचिव, राजेश्वर एज्युकेशन सोसायटी, बुलढाणा, प्रमुख पाहुणे मा. राहुल पाटील अध्यक्ष, संस्थापक, मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर व प्रमुख पाहुणे मा.अरविंद उरकुडे विश्वस्त प्रमुख, मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

आयोजित समारंभात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित ”जागर मराठीचा २०२४” या विशेषंकाचे प्रकाशन होणार असून, याप्रसंगी प्रकाशन संस्थेतर्फे राज्यातील प्रसिद्ध कवी कवयित्रींच्या तब्बल १४ कविता संग्रहाचे प्रकाशनही प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तसेच राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या १८ शिक्षक, शिक्षिका यांना यावर्षीचा ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सोबतच विविध कार्यक्षेत्रात आपले आयुष्य खर्ची घालून प्रेरणादायी तसेच उल्लेखनीय कार्य करणा-या ४ जणांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

‘जागर मराठीचा’ या समारंभांतर्गत दुपार सत्रात ७ व्या राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन प्रसिद्ध कवी मा. अजीम नवाज राही यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख अतिथी राहुल पाटील, मुख्य संपादक व प्रकाशक ‘जागर मराठीचा’ आणि सौ. सविता पाटील ठाकरे, कार्यकारी संपादक, ‘जागर मराठीचा’ व मराठीचे शिलेदार समूहाचे सर्व सहप्रशासक व परीक्षक यांच्या उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी राज्यभरातून येत असलेल्या ७० कवींना काव्यभूषण पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. आयोजित कवी संमेलनात महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून येत असलेले ९५ निमंत्रित कवी, कवयित्री आपल्या काव्यरचनांचे सादरीकरण करणार आहे. सर्व निमंत्रितांना संस्थेतर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

मराठीचे शिलेदार व यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आयोजन समिती जागतिक मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेत आहे. बुलढाणा जिल्हा तसेच विदर्भातील मराठी भाषिक साहित्यिकांनी ‘जागर मराठीचा’ या संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील व मुख्य आयोजक नरेश शेळके सचिव, यशवंतराव चव्हाण सेंटर बुलढाणा यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles