उक्कलगाव शाळेस 1एकर 6 गुंठे जमीन दान म्हणून भेट; वारकरी महिलेचा मोठा सहभाग

उक्कलगाव शाळेस 1एकर 6 गुंठे जमीन दान म्हणून भेट; वारकरी महिलेचा मोठा सहभाग



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_शिवजयंती निमित्त लोकसहभागातून 43 इंची रंगीत टीव्ही शाळेस भेट_

परभणी: दिनांक 21/02/24 रोजी जि प प्रा शा उक्कलगाव तालुका मानवत येथील मुख्याध्यापिका सौ. गायकवाड मायादेवी अंकुश यांच्या शाळेसाठी 85 वर्षीय विधवा वारकरी (हल्ली मुक्काम) पंढरपूर विठ्ठल मंदिर येथील गंगुबाई एकनाथ पिंपळे, मेळगाव उक्कलगाव यांनी शाळेसाठी 1एकर 6 गुंठे जमीन दान करून रजिस्ट्री करून दिली. तसेच लोक सहभागातून 43 इंची रंगीत टिव्ही शिवजयंती निमित्त शाळेस भेट देण्यात आला.

याकरिता गायकवाड मायादेवी, तसेच शा. व्य. समिती अध्यक्षा सिंधू धुराजीराव उक्कलकर आणि उपाध्यक्ष अंकुश अमृतराव पिंपळे, तसेंच सर्व समिती सदस्य, आणि शिक्षक देशमुख, मिटकरी, तापकीर, चव्हाण, जाधव आणि वारकरी होगे महाराज यांनी केलेल्या अथक प्रयत्नाला यश आले.

आज दिनांक (२२) रोजी उक्कलगाव, तालुका मानवत येथील शाळेत, श्री.विलास रामभाऊ मिटकरी सर यांच्या 50 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शा.व्य.समिती, ग्रामपंचायत युवक मंडळ आणि चाहते मित्रमंडळ ज्येष्ठ नागरिक व्यापारी वर्ग, आणि शिक्षक वृंद, सर्व विद्यार्थी यांनी पुष्पगुच्छ देवून, आणि केक भरवून 50 व्या,वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, आदरणीय मिटकरी सर यांनी सर्व विद्यार्थी पालक आणि चाहत्यांना मिष्ठान्न भोजनाचीं मेजवानी दिली.

शिवजन्मोत्सवानिमित्त आणि वाढदिवसाच्या निमित्त, शंभूराजे युवक मंडळ आणि शाळेच्या वतीने घेण्यात आलेल्या गॅदरिंगच्या देणगीतून वर्ग 7 वी वर्गास 43इंची 14,500/रु किमतीचा led रंगीत tv गिफ्ट देण्यात आला. पाण्याची कायम स्वरूपी हॅन्ड वॉश स्टेशनचीं गरज पूर्ण करण्यात आली. महिला भगिनी आणि विद्यार्थीनींनी 50 दिव्यानी ओवाळून औक्षण करून उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्यात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles