‘मराठीचे शिलेदार’ प्रकाशनातर्फे ‘जागर मराठीचा’ संमेलनात १४ कविता संग्रहाचे प्रकाशन

‘मराठीचे शिलेदार’ प्रकाशनातर्फे ‘जागर मराठीचा’ संमेलनात १४ कविता संग्रहाचे प्रकाशन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर व यशवंतराव चव्हाण सेंटर, केंद्र बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागर मराठीचा’ हा कार्यक्रम ‘जागतिक मराठी भाषा गौरव दिनी’ अर्थात ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस मंगळवार, दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी दोन सत्रात ‘राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट इमारत’, ए. आर. डी. सिनेमा हॉलच्या मागे, मलकापूर रोड, बुलढाणा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. याप्रसंगी मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेतर्फे १४ कविता संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

‘जागर मराठीचा’ या कार्यक्रमाचे अध्यक्ष: मा. आ. डॉ. राजेंद्रजी शिंगणे, माजी मंत्री व पालकमंत्री, बुलढाणा (म.रा.), स्वागताध्यक्ष: मा. राधेश्यामजी चांडक उपाख्य भाईजी, संस्थापक अध्यक्ष, बुलढाणा अर्बन, ‘जागर मराठीचा’ या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मा.नरेश शेळके, सचिव, यशवंतराव चव्हाण सेंटर बुलढाणा जिल्हा, प्रमुख अतिथी मा. रवींद्रजी इंगळे चावरेकर, साहित्यिक तथा भाषा संशोधक, प्रमुख अतिथी मा. रमेशजी इंगळे उत्रादकर साहित्यिक व कादंबरीकार, प्रमुख पाहुणे मा. डॉ. सौ. संगीताताई काळणे पवार, सहसचिव, राजेश्वर एज्युकेशन सोसायटी, बुलढाणा, प्रमुख पाहुणे मा. राहुल पाटील अध्यक्ष, संस्थापक, मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर व प्रमुख पाहुणे मा.अरविंद उरकुडे विश्वस्त प्रमुख, मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

आयोजित समारंभात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित ”जागर मराठीचा २०२४” या विशेषांकाचे प्रकाशन होणार असून, याप्रसंगी प्रकाशन संस्थेतर्फे राज्यातील प्रसिद्ध कवी कवयित्रींच्या तब्बल १४ कविता संग्रहाचे प्रकाशनही प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्था नागपूर तर्फे खालील कवी कवयित्री यांच्या पुस्तकांची नावे

१) सौ. स्वाती तोंडे पाटील, पुणे: पालखी काजव्यांची
२) श्री. पांडुरंग घोलप, रायगड: शब्दफुले
३) श्री.भगवान एस.गायकवाड, परभणी: स्पर्शगंध मनाचा
४) सौ. ज्योती कार्लेवर,चंद्रपूर: अजाण वाट
५) श्री. गणेश पाटील, नंदुरबार; स्नेहवलय
६) सौ.अनुराधा भुरे, नांदेड: शब्दगंध
७) श्री.चंदू डोंगरवार, गोंदिया: परिश्रमाचे मोती
८) श्रीमती सविता धमगाये, नागपूर: पाऊले
९) श्री. बळवंत डावकरे, नांदेड: मौनातल्या वेदना
१०) सौ.वनिता गभणे, भंडारा: सदाफुली
११) सौ.संगीता रामटेके, गडचिरोली: काव्यसंगीता
१२) सौ.चारुशीला झरे, वाशिम: काहूर हुरहूर अन् दारवळ
१३) श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे, परभणी: मनाचा आढावा
१४) श्रीमती सविता धमगाये, नागपूर: दरवळ एक शब्दगंध

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles