गझलकार दीपक करंदीकर यांचे निधन

गझलकार दीपक करंदीकर यांचे निधन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे

पुणे: मराठीतील आघाडीचे कवी, गझलकार, आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह दीपक करंदीकर यांचे पुण्यात नुकतेच दुखःद निधन झाले (वय 69) त्यांच्या मागे पत्नी व मुलगा असा परिवार आहे. उच्च रक्तदाब व मधुमेह यांच्या उपचारासाठी करंदीकरांना एका खाजगी रूग्णालयात दाखल केले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करंदीकर यांच्या पार्थिवावर गुरूवारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

केंद्र सरकारच्या डिफेन्स अकाऊंट कार्यालयात सेवा बजावत असतानाच त्यांची साहित्य सेवाही सुरू होती. गझल हा काव्यप्रकार त्यांनी खास मेहनतीने आत्मसात केला होता. गझलकार सुरेश भट यांचे ते प्रिय शिष्य होते. कविसंमेलनात
“पेल्यावरी प्याले प्यालो तुझ्यामुळे मी
गर्दीत माणसांच्या आलो तुझ्यामुळे मी”
ही गझल आर्त स्वरात ते मंचावर स्वतः गाऊन सादर करीत असत. गोड गळा लाभलेल्या या कवीला काव्यक्षेत्रात खूप नावाजले गेले. “अक्षरधुनी..आक्षय धुनी” हा त्यांचा गझलांवरील मंचीय कार्यक्रम लोकप्रिय होता.

कविता व गझल याशिवाय करंदीकर यांनी ‘अभिनव व्यंकटेश महात्म्य’ आणि ‘संगीत श्रीनिवास-पद्मावती विवाह’ हे पाच संगीत नाटक, तसेच “दीपरामायण” हे धार्मिक ओवीबध्द लेखनही केले होते. विविध पुरस्काराने गौरावान्वित दीपक करंदीकर यांना काव्यशिल्प; भाऊसाहेब पाटणकर, महाकवी कालीदास हे मानाचे पुरस्कार प्राप्त आहेत. “धुनी गझलांची” आणि “कविकुल” हे गझल संग्रह प्रसिध्द. ‘गझलगंगा’ हा आगामी संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर होता.

पुण्यातील अनेक साहित्यिक संस्थांचे संस्थापक सदस्य असलेले करंदीकर विविध काव्य उपक्रमांशी जोडलेले होते. हिंदुत्व प्रेमी करंदीकर यांनी कुराण व बायबल या दोन्ही धर्मग्रथांचा आध्यात्मिकदृष्टीने अभ्यास मांडण्याचा मानस बोलून दाखवला होता व त्याचे लेखन सुरूही केले होते. दै. मुं. तरूणभारतशी त्यांचा विशेष स्नेह होता.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles