जागतिक मराठी भाषा गौरव दिनी’ ७ व्या राज्यस्तरीय कवी संमेलनात ९९ कवी करणार ‘जागर मराठीचा’

जागतिक मराठी भाषा गौरव दिनी’ ७ व्या राज्यस्तरीय कवी संमेलनात ९९ कवी करणार ‘जागर मराठीचा’



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

राज्यातील ७२ कवी कवयित्री ‘काव्यभूषण पुरस्कारा’ने होणार सन्मानित

नागपूर: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर व यशवंतराव चव्हाण सेंटर, जिल्हा केंद्र बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागर मराठीचा’ हा कार्यक्रम ‘जागतिक मराठी भाषा गौरव दिनी’ अर्थात ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस मंगळवार, दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी दोन सत्रात ‘राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट इमारत’, ए. आर. डी. सिनेमा हॉलच्या मागे, मलकापूर रोड, बुलढाणा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे.

‘जागर मराठीचा’ या कार्यक्रमाचे अध्यक्ष: मा. आ. डॉ. राजेंद्रजी शिंगणे, माजी मंत्री व पालकमंत्री, बुलढाणा (म.रा.), स्वागताध्यक्ष: मा. राधेश्यामजी चांडक उपाख्य भाईजी, संस्थापक अध्यक्ष, बुलढाणा अर्बन, ‘जागर मराठीचा’ या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मा.नरेश शेळके,सचिव, यशवंतराव चव्हाण सेंटर, जि. केंद्र बुलढाणा, प्रमुख अतिथी मा. रवींद्रजी इंगळे चावरेकर, साहित्यिक तथा भाषा संशोधक, प्रमुख अतिथी मा. रमेशजी इंगळे उत्रादकर साहित्यिक व कादंबरीकार, प्रमुख पाहुणे मा. डॉ. सौ. संगीताताई काळणे पवार, सहसचिव, राजेश्वर एज्युकेशन सोसायटी, बुलढाणा, प्रमुख पाहुणे मा. राहुल पाटील अध्यक्ष, संस्थापक, मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर व प्रमुख पाहुणे मा.अरविंद उरकुडे विश्वस्त प्रमुख, मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

‘जागर मराठीचा’ या समारंभांतर्गत दुपार सत्रात ७ व्या राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन प्रसिद्ध कवी व ज्येष्ठ साहित्यिक मा. अजीम नवाज राही यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख अतिथी राहुल पाटील, मुख्य संपादक व प्रकाशक ‘जागर मराठीचा’ आणि सौ. सविता पाटील ठाकरे, कार्यकारी संपादक, ‘जागर मराठीचा’ व मराठीचे शिलेदार समूहाचे सर्व सहप्रशासक व परीक्षक यांच्या उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी राज्यभरातून येत असलेल्या ७२ कवींना काव्यभूषण पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. आयोजित कवी संमेलनात महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून येत असलेले ९९ निमंत्रित कवी, कवयित्री आपल्या काव्यरचनांचे सादरीकरण करणार आहे. सर्व निमंत्रितांना संस्थेतर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles