हिंगणा येथे ग्रेट स्कॉलर पब्लिक स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात

हिंगणा येथे ग्रेट स्कॉलर पब्लिक स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वर्षभर विविध उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

जिल्हा प्रतिनिधी, नागपूर (बिनधास्त न्यूज वृत्तसेवा)

हिंगणा: नागपूर ग्रामीण भागाताही शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावणा-या अमरनगर वानाडोंगरी स्थित ग्रेट स्कॉलर पब्लिक स्कूल येथे नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.

कार्यक्रमाचे उद्घाटन एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण काळे, वाहतूक शाखा एम.आय.डी.सी. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नरेंद्र वानखेडे व वाहतूक शाखा एम.आय.डी.सी. पोलीस निरीक्षक श्री विजय धुमाळ , हिंगणा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनोदजी गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला उपस्थित पालक वर्ग व नागरिकांना नरेंद्रजी वानखेडे यांनी वाहतूक तिचे नियम पाळण्याकरिता संबोधले यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गघदर्शन करतांना सांगितले, की आपले पालक घरून कुठलेही वाहन घेऊन जात असताना त्यांना डोक्यावर हेल्मेट वापरण्याकरिता आवर्जून सांगावे, तसेच चार चाकी वाहन चालवत असाल तर सीट बेल्ट नक्की लावावे अशा याप्रसंगी सूचनाही केल्यात. यावेळी अतिथी म्हणून नितीन साखळे माजी बांधकाम सभापती न.प. वानाडोंगरी, पोलीस बॉईजचे जिल्हाध्यक्ष राकेश करंडे, गजानन ढाकूलकर, सौरभ झा, मंगेश आंबुलकर , सुरज कंबाले उपस्थित होते.

कार्यक्रमात मुलांनी रंगारंग नृत्य सादर केले व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. व प्रेक्षकांनी वाहवा लुटवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. तसेच कार्यक्रमात वर्षभर झालेल्या विविध स्पर्धांची पारितोषिके व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यामध्ये बेस्ट पेरेंट्स म्हणून परिहार फॅमिली, ठाकूर फॅमिली व मच्छीरके फॅमिलीला सन्मानित करण्यात आले, बेस्ट स्टुडन्ट म्हणून २०२३-२४ करिता पुनम मलघाटी , रुहाणी वासनीक, सानवी राऊत यांना सन्मानित करण्यात आले. शाळेतील काही शिक्षकांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बेस्ट टीचर म्हणून गौरविण्यात आले. यामध्ये प्रतीक्षा राऊत, दिव्या हनवत, विना नाकाडे, रूपा बोटकावार या शिक्षकांचा समावेश होता.

याप्रसंगी शाळेचे संचालक कमलेश खोब्रागडे, शैलेंद्र साखरवाडे यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता रोहित मोहारे ,मनीष शेंद्रे, ममता कटरे, प्रतीक्षा राऊत, रूपा बोटकावार, दिव्या हनवत, विना नाकाडे, वर्षा खोब्रागडे, उषा लील्हारे, हेमलता बिसेन, राजेश साहू, कुंदन निनावे, संगीता साखरवाडे, प्रीती धमगाये यांनी विशेष सहकार्य केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles