शतक नावीन्यपूर्ण उपक्रमाचे पुस्तक प्रकाशन सोहळा

शतक नावीन्यपूर्ण उपक्रमाचे पुस्तक प्रकाशन सोहळा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वसुधा वैभव नाईक, पुणे प्रतिनिधी

पुणे: नवी दिशा,नवे उपक्रम राज्य स्तरीय शैक्षणिक समूहाच्या वतीने दिनांक ९ मार्च २०२४ ला पुणे येथे शतक नावीन्यपूर्ण उपक्रमाचे पुस्तक प्रकाशन सोहळा, महाराष्ट्रातील गुणवंत १०४ शिक्षकांना राज्य स्तरीय गुणवंत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे.

गेल्या सात वर्षांपासून नवी दिशा,नवे उपक्रम समूह सातत्याने सुरू असून महाराष्ट्रातील शिक्षकांना उपक्रम दिशा देण्याचे उत्कृष्ट कार्य करीत आहे. शिक्षक, विद्यार्थी, शाळा यांना या समूहाचा फायदा होत आहे.समूहाच्या माध्यमातून,समूह सदस्यांच्या सहभागातून,देणगी दाते यांनी दिलेल्या मदतीने दरवर्षी नवनवीन सामाजिक, शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जातात.

यावर्षी महाराष्ट्रातील १०४ उपक्रमशील शिक्षकांना एकत्रित
करून त्यांनी प्रत्यक्ष वर्गात राबविलेल्या उपक्रमांचे “शतक नावीन्यपूर्ण उपक्रमाचे” पुस्तक तसेच यांनी केलेल्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची समूहातर्फे दखल घेऊन त्यांना राज्य स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार दिनांक ९ मार्च २०२४ रोजी राजीव गांधी ईलर्निंग स्कूल सहकारनगर पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.

संपादक मंडळाच्या वतीने सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून भव्यदिव्य सोहळा निश्चितच संपन्न होणार आहे. अशी माहिती संपादक/समूह संयोजक श्री.देवराव चव्हाण यांनी दिलेली आहे. या सोहळ्याच्या तयारी , नियोजना करिता प्रकल्प प्रमुख श्री.आयुब शेख, श्री.बळीराम जाधव, मा.विजया महाडिक मॅडम, शीतल मदने, प्रवीण पोटे, गणेश कामथे, संगीता म्हस्के, श्रीकांत देवकर, सोपान बंदावणे, हेमलता चव्हाण, जयश्री जायभाये, मनिषा बोर्डे, ज्योत्स्ना पास्ते, संगीता बागुल आदी सर्व संपादक निर्मिती मंडळ दिनरात्र कष्ट घेताना दिसत आहे.

यासोबतच विजया महाडिक यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक साहित्य स्टॉल उभारणी, शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांचे ‘शिक्षकांसाठी सानेगुरुजी’ या विषयावर व्याख्यान, शिक्षणविषयक विचार मंथनही होणार असल्याचे संपादकांनी सूचित केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles