सिध्दार्थ शिरोळे यांच्या आमदार निधीतून निलज्योती सोसायटीत विकासकामांचे भूमिपूजन

सिध्दार्थ शिरोळे यांच्या आमदार निधीतून निलज्योती सोसायटीत विकासकामांचे भूमिपूजन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी

पुणे.दि.2 (प्रतिनिधी) शिवाजीनगर भागाचे आमदार सिध्दार्थ शिरोळे यांच्या आमदार निधीतून गोखलेनगर, निलज्योती हौसिंग सोसायटीतील म्हाडा वसाहतीच्या ईमारतींसाठी पिण्याच्या पाण्याची पूर्णक्षमतेची टाकी बांधणे तसेच नव्या पाईप लाईनसह, रस्ते क्राॅक्रींटीकरण अशा बहुप्रतिक्षित विविध विकासकामांचे भूमिपूजन समारंभपूर्वक नुकतेच करण्यात आले.

आमदार सिध्दार्ध शिरोळे यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमाला सोसायटीचे अध्यक्ष, शिवदास भोसले, विकास राऊत, सेक्रेटरी श्री अरूण खाकुर्डीकर तसेच नगरसेविका राजश्री काळे, माजी नगरसेवक लक्ष्मण लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास परीक्षित बटवाल,श्री बाळासाहेब कोंडे, श्री बुधकर तसेच नवयुग तरूण मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि परिसरातील प्रतिष्ठीत नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सामाजिक कार्यकर्ते श्री. योगेश बाचल, यांनी या कामांसाठी सतत पाठपुरावा केला.या विकास कामांमुळे सुरळीत पाणी पुरवठा आणि सोसायटी अंतर्गत सुस्थितीतील रस्त्यांचे काम अखेर मार्गी लागल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गणेश बगाडे,आनंद छाजेड,लक्ष्मण नलावडे विकास डाबी, रोहित लिंबाळे,नाना दरेकर, अण्णा धोत्रे, धनंजय देशमुख,राजु मिटकरी, राजाभाऊ वंकाडे ईत्यादी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles