सामना; विष्णू संकपाळ

सामनापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

समोर हजार संकटांचा
उभा राहो खडा मेळावा
हा जीवन रूपी सामना
खिलाडूवृत्तीने खेळावा.. //

कधी जिव्हारी लागे हार
न्युनगंड मनात नसावा
पराजयाची चर्चा व्हावी
असा जिद्दि खेळ असावा.. //

खेळ अजब जीवनाचा
खेळवत असतेय नियती
कधी कुणास हुलकावणी
तर कुणास संधी आयती… //

तिचे अनभिज्ञ अतर्क्यच
असतात शह काटशह
कधी आपण मारू बाजी
कधी करावा लागतो तह… //

कधी टाकती असे फासे
फितुर होती सच्चे साथी
तो क्षण खरा कसोटीचा
मोर्चा लढवावा एकहाती… //

जन्मापासून मृत्यू पर्यंत
सामना अत्यंत चुरशीचा
अनपेक्षित कलाटणीचा
रोमांचक क्षण सरशीचा.. //

हारजीतीची नको पर्वा
निग्रहाने टक्कर घ्यावी
दस्तुर खुद्द नियतिनेही
या हिम्मतीला दाद द्यावी… //

विष्णू संकपाळ बजाजनगर
छ.संभाजीनगर
========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles