मराठी भाषा’ सक्षमीकरणासाठी राबणाऱ्या हातांना कर्तृत्वाने दिला हात…!

मराठी भाषा’ सक्षमीकरणासाठी राबणाऱ्या हातांना कर्तृत्वाने दिला हात…!पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्राचीन मराठी वैभवशाली परंपरा लाभलेल्या मराठी भाषेला आजकाल इंग्राजलेल्या मानसिकतेमुळे अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. शहरात सोडा पण, अगदी खेड्यापाड्यात पण इंग्रजी भाषेबाबत लोकांमध्ये पुतना मावशीचे प्रेम निश्चितपणे मराठी भाषेच्या पुढे अनेक नवी आव्हान उभी करत आहे. मराठीत दर्जेदार साहित्य आहेच, परंतु त्या साहित्याचा वाचक वर्ग दिवसेंदिवस कमी होत आहे. या उलट तोडूनमोडून जोडलेलं इंग्रजी साहित्य वाचनावर लोकांचा अधिक कल आहे. पण सर्वजण हे निमूटपणे सहन कसे करतील? मराठीसाठी काहीतरी केलं पाहिजे…या मानसिकतेवर मराठी संवर्धनासाठी राबणाऱ्या हातांपैकी एक हात म्हणजे…. ‘मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर’.

गेल्या दहा वर्षापासून अनेक उपक्रमांच्या माध्यमातून भाषा टिकावी, जोपासावी, तिचं संवर्धन व्हावं यासाठी आदरणीय राहुल सर अनेक उपक्रम राबवत आहेत. त्यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे, ‘मराठी भाषा गौरव दिन’. यावर्षी २७ फेब्रुवारीचा हा उत्सव बुलढाणा येथे व्हावा असा शब्द यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्रचे सचिव आदरणीय नरेश शेळकेजी यांनी दिला होता आणि शब्द कसा पाळावा याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिलेले आहे. नुकताच आपण एक यशस्वी कार्यक्रम पार पाडलेला आहे.

या संदर्भातल्या नियोजन बैठकीसाठी २८ जानेवारीला मी ही स्वतः बुलढाणा येथे गेलो होतो. त्याच वेळेस नरेशजी शेळके यांच्यातील सकारात्मकता पहावयास मिळाली. स्थानिक पातळीवरच्या नियोजनाची सर्व जबाबदारी पार पाडत असताना, त्यांनी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टची इमारत कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिली. सोबतच बुलढाणा जिल्ह्यातील अनेक साहित्यिकांना मान देऊन या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती पहावयास मिळाली. विशेष करून बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष भाईजी हे अतिशय व्यस्त असतात; तरी सुद्धा त्यांनी आपल्या कार्यक्रमासाठी पुरेसा वेळ दिला. बुलढाणा शहर आणि जिल्ह्यातील अनेक साहित्यिकांनी या विचार मंचावरून आपल्या भावना प्रकट केल्यात.कवी संमेलनिध्यक्ष अजीम नवाज राही सरांचं भाषण ऐकून व त्यांचा व्यासंग पाहून कृत्य झाल्यासारखे वाटले. काही कारणास्तव जरी शिंगणे साहेब अनुपस्थित होते. परंतु इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम पूर्णतः यशस्वी झाला.

ही झाली कार्यक्रमाची एक बाजू…! दुसऱ्या बाजूला गेल्या अनेक वर्षांपासून ‘एकला चलो रे’ या भूमिकेवर नेहमीच काम करणारे राहुल सर ही मला जवळून अनुभवास मिळाले. तसं पाहता एवढा मोठा कार्यक्रम करून घेणं हे वाटतं तितकं सोपं नाही. यात अनेक लहान लहान गोष्टींचे नियोजन खूप महत्त्वपूर्ण असते. विशेषतः अतिथींचा सत्कार, कविवर्य यांचा सत्कार, जीवन गौरव व आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी लागणारे साहित्य, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह या सर्व कामात राहुल सर नेहमी एकटेच असतात व याही वेळेस त्यांनी एकट्याने ही जबाबदारी पार पाडून दाखवली. अतिशय सुंदर असे सन्मानपत्र, मानपत्र आणि सन्मान चिन्ह निश्चितच कौतुकास पात्र आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक शिक्षकांनी व कवींनी आपली उपस्थिती त्या ठिकाणी दर्शविली व कार्यक्रम यशस्वी झाला असला तरी, एक खंत मला स्वतःला वाटते ती म्हणजे थोड्या प्रमाणात कमी असलेली उपस्थिती.

काहीजण आधी आम्ही निश्चित येणार येणार असे सांगत होते. परंतु ऐन वेळेस छोट्या-मोठ्या कारणांना पुढे करत येण्यास असमर्थता दर्शवली. जेव्हा आपण एखादे आयोजन करतो. तेव्हा आपण आयोजकांची मेहनत ही लक्षात घेतली पाहिजे व कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे वैयक्तिक रित्या मला वाटते. असो.. शेवटी एकच मराठी भाषा सक्षमीकरणाच्या राहुल सरांच्या यज्ञात यावर्षी नरेशजींनी जी निस्वार्थ आहुती दिली ती तमाम मराठी भाषा प्रेमी व साहित्यिकांसाठी कौतुकास पात्र आहे.

प्रशांत ठाकरे, सिलवासा
दादरा नगर हवेली (केंद्रशासित प्रदेश)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles