पायपीट; आशा कोवे-गेडाम

पायपीटपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गांजलेल्या जीवनाचा मार्ग राठ आहे
भंगलेल्या पापणीचा पूर दाट आहे |

दिनरात कष्टते उरातली माया
स्वप्नातील हिरवळीचा गाव दूर आहे |

काटेरी बन उभे घायाळली आशा
नशिबाच्या पैरणीचा भाव दुजा आहे |

भूकेच्या परिक्रमेचे उपेक्षित जिणे
दारिद्र्याचे नांदणे अजून घट्ट आहे |

संपता संपेना आयुष्याची पायपीट
समाधानाचे चांदणे दूर उभे आहे |

नको माणिक-मोती चैनीच्या झालरी
गुदमणा-या जीवाला श्वास हवा आहे |

समूहाच्या मैफिलीची साथ मूळीच नाही
प्रांक्तनाच्या डोहातला खेळ रोज नवा आहे |

निसर्गाच्या सोहळ्यात फुटव्याचे बळी जाणे
निराधार आर्ततेचा आक्रोश मूक आहे |

निगरगट्ट चिंधीत लपेटली दुखरी खपली
अस्तित्वाच्या संघर्षासाठी साहस उभे आहे |

खंगलेल्या देहासवे ताठ उभे चालणे
उगवेल नवी पहाट आस अजून आहे |

आशा कोवे- गेडाम
वणी जि.यवतमाळ

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles