स्त्री आणि गणित;सौ अनिता अनिल व्यवहारे

स्त्री आणि गणितपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नतमस्तक तिच्या चरणी मी, अगाध तीची गाथा
साहुनी सारी कष्ट अन वेदना, अशी स्त्री ही जगन्माता..!

एकविसावं शतक म्हणजे मानवाने आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी खूप मोठा पल्ला गाठला आहे. पण त्यात स्त्री-पुरुषांमधील नैसर्गिक भेदाला जे विकृत वळण दिले आहे, ते त्या मानवी प्रतिष्ठेचा अपमान करण्यासारखे आहे. तिच्या उदरातून आपला जन्म झाला त्या आईच्या नात्यापासून आपण जगातील नाती जगायला आणि पाहायला लागलो, पण तो तिची जन्माची नाळ तोडायला निघाला. पण खरंच ती तोडता येईल काय? पुरुषांनी चालवलेला हा भेदाभेद घरापासून सुरू होतो. प्रत्येक आई-वडिलांना आधी मुलगाच व्हावा असं वाटतं कारण तो वंशाचा दिवा, घराण्याचा वारस.असतो … मुलगी काय शेवटी परक्याचं धन.. आई वडिलांचे नाव थोडेच पुढे नेणार म्हणून मुलीची ऊपेक्षा मग स्त्रीला जगणे मुश्कील होतं आणि मग समाजाच्या दृष्टीने स्त्री ही प्रत्येक बाबतीत पुरुषांच्या मानाने दुबळी मानली जाते आणि हे चित्र फक्त समाज, संस्कृती इथेच नाही तर अगदी प्रसारमाध्यमे याला खतपाणी घालताना दिसतात.

टीव्हीवर सध्या दाखविण्यात येणाऱ्या प्रत्येक मालिकेत कुटुंबातले राजकारण दाखवलं जातं आणि त्यात खलनायिका असते त्या घरातली घरंदाज कर्ती स्त्री. एकीकडे घरातील लाखोंची उलाढाल ती करते पण तितकच त्यात कूटनीतीचा राजकारणी ती करते आणि आपण स्त्रीया या मालिका अगदी आवडीने पाहतो.. सब टीव्ही वर एक मालिका चालू होती “तारक मेहता का उल्टा चश्मा “यात आत्माराम भिडे या शिक्षकाचे कुटुंब. त्याची बायको त्याला कूकरच्या चार शिट्या झाल्यावर गॅस बंद करायला सांगते. त्यावर तो म्हणतो, मी गणिताचा शिक्षक आहे म्हणून का कुकरच्या शिट्ट्या मोजत बसू का.? येथे विनोद झाला म्हणून आपण हसत असतो.. पण यातून सिरीयल कर्त्याला काय सूचित करायचं की स्त्रीने फक्त कुकरच्या शिट्ट्याच मोजायच्या … तर एका कवीने सुद्धा… स्रियांना गणित शिकवलं नाही तर त्या कुकरच्या शिट्ट्या कशा मोजणार म्हणून विनोद केला.

तर अशी ही स्त्री.. एकीकडे म्हणायचे की परमेश्वराच्या अगाध लीलामधून साकारलेली मुर्तिमंत, अतिशय लावण्याची सौंदर्याची, प्रत्यक्ष परमेश्वराची प्रतिकृती आणि दुसरीकडं तिला चढवायचा प्रदुषणांचा साज.. तिने मात्र हे सर्व सहन करायचं, नव्हे तर तिला सहन करायला लावायच आणि म्हणायचं स्त्री खूप महान आहे, ती भावनेचा अधिष्ठान आहे. म्हणूनच तर तिचं स्थान मानाचआहे.. तिने स्वीकारलय की, ‘जीवन मे आये है तो जीना ही पडेगा
जीवन है जहर तो पीना ही पडेगा’ त्यामुळे ती स्वतःच्या अस्तित्वाची भाग्यरेषा शोधून चौकटीपलीकडे विश्व शोधण्याचा प्रयत्न करू लागली आहे.. नाती जोपासताना तडजोड करते आहे. स्वतः स्वतःची लढाई करून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करू लागली आहे. तिच्याकडे असलेल्या सर्जनशीलतेचा उपयोग करून चूल आणि मूल या ही पलीकडच्या तिच्या अस्तित्वाची जाणीव जगाला करून देऊ लागली आहे. याची अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत.

मागेच मी तुम्हाला म्हटलं की स्त्रिया गणिताच्या बाबतीत पुरुषांच्या मागेच आहेत. गणित जमत नाही तर व्यवहार कुठून कळणार? व्यवहार नाही तर अर्थकारण कसं समजणार? असं म्हणणाऱ्या या समाजाला सांगावसं वाटतं, अरे तुम्ही समाजात व्यवहार करता पण घरातल्या व्यवहाराचं काय तो तर स्त्रियांच्या हिशोब आवर चालतो. घरात मुलांचा अभ्यास घेणे असो की प्रत्येकाच्या आहार-विहाराचे वेळापत्रक असो ते तिलाच करावं लागतं कुकर मध्ये पाणी किती घालावे इथपासून ते चार माणसांना किती अन्न लागेल हा हिशोब तिलाच ठेवावा लागतो. इतकेच काय मोलमजुरी करणारी अशिक्षित स्त्री असो की चार आकडी पगार कमावणारी सुशिक्षित स्त्री असो, पगाराचा पैसा हातात आला की घरी येताना मुलांना खाऊ घ्यावा, संध्याकाळसाठी भाजी घ्यावी हे तिचं खर्चाचं गणित. पगार झाल्यावर घरी येताना पुरुष काय गणित करतो, चार मित्रांना घेऊन हॉटेलमध्ये चहा पाजणं टपरीवर जाऊन पान सिगरेट घेणे इत्यादी इत्यादी….!

मी म्हणत नाही की स्त्री ही पुरुषापेक्षा जास्त हुशार आहे व्यवहारकुशल आहे, पण ती त्याच्याबरोबर अन्य प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे… तिच्या या प्रयत्नांना साथ हवी आहे. ती पुरुषांनी द्यावी, समाजाने द्यावी… तिला हवी. मुक्ती संघर्षापासून…. हर्षा पासून नव्हे, तिला हवी मुक्ती अधोगती पासून…. गती पासून नव्हे, तिला हवी मुक्ती अन्यायापासून… न्यायापासून नव्हे, तिला हवी मुक्ती बुरसटलेल्या विचारापासून…. चांगल्या विचारापासून नव्हे…. तिला हवी मुक्ती पतीच्या मारहाणीपासून… पतीपासून नव्हे. तरच खऱ्या अर्थाने आज शंभर वर्षापासून साजरा केला जाणारा हा महिला दिन खऱ्या अर्थाने सुवर्ण दिन म्हणता येईल. महिला दिनानिमित्त सर्व महिला भगिनी मैत्रिणी माता यांना आदरपूर्वक नमस्कार आणि शुभेच्छा धन्यवाद…!

सौ अनिता अनिल व्यवहारे
ता.श्रीरामपूर जि अहमदनगर
=========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles