एकदिवसीय निपुण उत्सव कार्यक्रम संपन्न

एकदिवसीय निपुण उत्सव कार्यक्रम संपन्नपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अकोला व शिक्षण विभागाचे आयोजन

अकोला : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अकोला, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, अकोला व लीडरशिप फॉर इक्विटी(एल.एफ.ई.) यांच्या संयुक्त विद्यमाने निपुण उत्सव कार्यक्रम दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी हॉटेल आरजी अकोला येथे पार पडला.

यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अकोलाच्या प्राचार्य रत्नमाला खडके, वरिष्ठ अधिव्याख्याता अंकोश ससाने, अधिव्याख्याता शैलेश पाटिल, नितीन भालचक्र, विजयसिंग राठोड, प्र.विस्तार अधिकारी रफत खान, डॉ. जितेंद्र काठोळे, गोपाल सुरे व इतर मान्यवर उपस्थित होते. नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार निपुण भारत अभियान अकोला जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान हा निपुण भारत मिशनमधील महत्त्वाचा भाग असल्याने २०२६-२७ पर्यंत आपल्याला त्यातील उद्दिष्टे साध्य करायची आहेत. या कार्यक्रमाचा उद्देश पायाभूत संख्याज्ञान व साक्षरता संदर्भात लोकांना प्रेरित करणे आणि मागील शैक्षणिक वर्षातील प्रगती आणि त्रुटींबद्दल चर्चा करणे. ज्याच्या आधारावर पुढील शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मधील योजनांमध्ये बदल करणे होता. त्यासोबतच निपुण भारत अभियानाच्या अंमलबजावणी बाबत केंद्रप्रमुख आणि विषय साधन व्यक्तींमध्ये या विषयाबद्दल स्पष्टता निर्माण करणे आणि २०२६ -२७ पर्यंत निपुण भारत अभियानाची उद्दिष्टे गुणात्मक पद्धतीने पूर्ण करणे या कार्यक्रमाचा मुख्य घटक होता.

डाएट प्राचार्य रत्नमाला खडके यांनी शिक्षकांच्या भूमिकेबाबत बोलताना, मुलांमध्ये मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान आत्मसात करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. निपुण भारत अभियान अंतर्गत जिल्ह्यातील सर्व बालकांना भाषा साक्षर आणि संख्याज्ञानात निपुण करण्यासाठी आवश्यक असलेल्या तरतुदींचे शाळास्तरापर्यंत पोहाचण्यासाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पर्यवेक्षीय यंत्रणेचे निपुण बालक घडविण्यात योगदान फार महत्वाचे आहे, हे देखील नवीन शैक्षणिक धोरणात आणि निपुण भारत अभियानात देखील नमूद करण्यात आलेले आहे. वरीष्ठ अधीव्याख्याता अंकोश ससाणे यांनी निपुण भारत अभियानाचे महत्व व गरज पटवून दिली. अधिव्याख्याता शैलेश पाटील यांनी पायाभूत संख्याज्ञानाचे उपघटक यावर मार्गदर्शन केले.

एलएफईचे आशिष देशमुख, मयुरी तिजारे यांनी पायाभूत साक्षरतेचे उपघटक यावर चर्चा घडवून
आणली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एलएफईचे अभिजित पाटील यांनी केले. सुत्रसंचालन वैशाली शेंडे तर
आभार प्रदर्शन सचिन दळवी यांनी केले.

कार्यक्रमाला तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती तसेच एलएफई व सीएलआरचे सभासद उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.विश्वास नागरे, बालाजी शेळके, रवींद्र सोनुने यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles