‘उत्तमराव अंड्रस्कर’ ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित

‘उत्तमराव अंड्रस्कर’ ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर व यशवंतराव चव्हाण सेंटर, केंद्र बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जागतिक मराठी भाषा गौरव दिन’ सोहळ्याच्या पहिल्या सत्रात सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार वितरण समारंभ ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवशी ‘जागर मराठीचा’ या कार्यक्रमात मंगळवार, दि.२७ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट इमारत’, ए. आर. डी. सिनेमा हॉलच्या मागे, मलकापूर रोड, बुलढाणा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

चंद्रपूर येथे गेल्या ३५ वर्षांपासून टॅक्स प्रॅक्टिशनर म्हणून नावाजलेले श्री. उत्तमराव अंड्रस्कर यांना मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर यांच्या तर्फे ‘जीवनगौरव पुरस्कार २०२४’ संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. राहुल पाटील आणि यशवंतराव चव्हाण सेंटर, बुलढाणाचे सचिव माननीय नरेशभाऊ शेळके यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. रमेशजी इंगळे उत्रादकर साहित्यिक व कादंबरीकार, स्वागताध्यक्ष मा. राधेश्यामजी चांडक उपाख्य भाईजी, संस्थापक अध्यक्ष, बुलढाणा अर्बन, मुख्य आयोजक व व सचिव, यशवंतराव चव्हाण सेंटर, जिल्हा केंद्र बुलढाणा मा. नरेश शेळके, प्रमुख अतिथी मा. डॉ. सौ. संगीताताई काळणे पवार, सहसचिव, राजेश्वर एज्युकेशन सोसायटी, बुलढाणा,मा. राहुल पाटील अध्यक्ष, संस्थापक, मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर व मा.अरविंद उरकुडे, गडचिरोली विश्वस्त प्रमुख तर प्रमुख पाहुणे मा. डॉ.अण्णासाहेब म्हळसणे, मा.रणजितसिंग राजपूत, मा. शंकर महाराज येळगांवकर, मा.विजय गवारगुरू, मा. रामकृष्ण म्हस्के, मा. डॉ. सौ. विजयाताई काकडे, मा.विजयाताई कोळसे, आ.उर्मिलाताई बाविस्कर, आ.गायत्रीताई सावजी, आ.ज्योतीताई पाटील, आ.ज्योतीताई खेडेकर, आ.लक्ष्मीताई शेळके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles