विधिलिखित असलेले कर्म,धर्म, संयोग सकारात्मकतेने स्वीकारावे”; विष्णू संकपाळ

“विधिलिखित असलेले कर्म,धर्म, संयोग सकारात्मकतेने स्वीकारावे”; विष्णू संकपाळपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

“भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी,
अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी..”

ज्येष्ठ कवीवर्य मंगेश पाडगावकर यांचे हे शब्द. या शब्दरचनेतील संदर्भीय गुढार्थाचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला तर तो एक वेगळाच लेखप्रपंच होईल. मात्र आजच्या चित्र चारोळी परिक्षणाच्या निमित्ताने याच ओळी का निवडल्या हे चाणाक्ष वाचकांच्या नक्कीच लक्षात येईल. मानवी जीवन हे कर्म अकर्म आणि अचंबित करणार्‍या अटळ योगायोगांनी भरलेले आणि भारलेले आहे. जीवन असो की मृत्यू, लग्न असो की विघ्न,भेटणे असो की दुरावणे प्रत्येक घटनेमागे एक निश्चित कार्यकारणभाव दडलेला आहे. म्हणून, तर अगदीच किरकोळ कारणानेही एखाद्याचा जीव जातो किंवा भूकंपासारख्या प्रचंड उलथापालथीतूनही कोणी सहीसलामत वाचते. यालाच जीवन ऐसे नाव.

इतर सर्वच नात्यांना जन्म देणार्‍या पतीपत्नीच्या नात्यात दोन अपरिचित (कधी परिचित) जीव अग्नीसाक्षीने वचनबद्ध करून विवाह बंधनात बांधले जातात आणि एक दोन नव्हे तर अनंत जन्म साथसंगतीसाठी सांधले जातात. ही घटना वरकरणी मानवी प्रयत्नांचा भाग जरूर असला तरीही यामागे सुप्त संकेत काही वेगळेच असतात. ज्याला आपण विधिलिखित म्हणतो. मानवी प्रयत्न आणि हे सुप्त संकेतांचे योगायोग जुळून आल्याशिवाय ऋणानुबंधांच्या गाठी बांधल्या जात नाहीत यांची प्रचिती अनेकांना आली असेल.

विवाह हा एक भारतीय संस्कृतीतला फार मोठा पवित्र आणि महत्वाचा संस्कार आहे. कारण यातूनच अंश रूपाने वंश विस्तारीत होत असतो. दोन मने दोन परिवार आणि समाज परस्परांशी सांधला जातो. आणि सभ्य आचार विचार संक्रमित होत असतो. म्हणून कर्म धर्म संयोग अर्थात विधिलिखितालाच सकारात्मक वैचारिकतेने स्विकारावे. काल चित्र चारोळी स्पर्धेसाठी समूह प्रमुख आदरणीय दादांनी जे चित्र दिले होते ते याच आशयाचे होते. वैवाहिक विधीला विधिलिखितच्या कोंदणात बसवताना काही शिलेदारांनी खूप मार्मिक भाष्य केले आहे. काहींनी याच अपरिहार्यतेला अधोरेखित केले आहे. तर काहींनी हे सर्व विधिलिखित असेल तर भातुकलीच्या खेळासारखे अकालीच का तुटते? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

व्यक्ती तितके विचार जरूर असतात. या अनुषंगाने एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, केवळ विधिलिखित म्हणून आपण आपल्या वैचारिक कमजोरीवर विसंवादावर स्वार्थी प्रवृत्तीवर पांघरूण घालू शकत नाही. समस्त शिलेदारांनी या निमित्ताने खूप सुंदर लिखाण केलेले आहे; तरीही अजून खोलात जाऊन वास्तवदर्शी होण्याचा सातत्याने प्रयत्न करावा..सर्वांच्या लेखणीला आभाळभर शुभेच्छा..! आजचे परिक्षण लिहिण्याची संधी मला दिल्याबद्दल समूह प्रमुख आदरणीय राहुल दादा आणि प्रशासकीय टिमचा मी ऋणी आहे.

विष्णू संकपाळ, बजाजनगर छ. संभाजीनगर
©परीक्षक, सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles