अपंग व महिला कर्मचाऱ्यांनाही निवडणुकीचे कामे द्यावीत

अपंग व महिला कर्मचाऱ्यांनाही निवडणुकीचे कामे द्यावीतपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

धडधाकट पुरुष कर्मचा-यावर होणारा अन्याय कमी करावा

सोलापूर: आज महिलांना सर्व क्षेत्रात समान संधी देण्यात येत आहेत. आपण महिला कर्मचान्यांना निवडणूकीचे काम नाकारून समस्त स्त्री वर्गाचा अपमान करत आहात असे वैयक्तिक मत अनिल देशपांडे यांनी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. महिला आहेत म्हणून त्यांना कमी वेतन आहे का? तर नक्कीच नाही. समान वेतन समान काम पाहीजे पण आपण निवडणुकीच्या कामाला फक्त धडधाकड पुरुषांनाच राबवित आहात. जशा महिलांना अडचणी आहेत तशा पुरुषांना अडचणी नाहीत का? स्त्री पुरुष समान समजता तर मग याठिकाणी फक्त पुरुषच का कामाला घेण्यात येत आहेत. निवडणुकीच्या कामकाजात महिला कर्मचाऱ्यांना संधी देऊन त्यांच्याही कर्तृत्वाला संधी दिली पाहीजे.

त्यांच बरोबर आज अनेक कर्मचारी यदली व बढतीसाठी अपंग झालेले आहेत, असे बनावट अपंग कर्मचारी ४० टक्के पेक्षा जास्त मॅनेजेवल प्रमाणपत्र सादर करुन निवडणूकीच्या कामातुन मोकळे होतात. आज बाशीं तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकुण ५८८ शिक्षक कार्यरत आहेत. पैकी त्यातील साधारण २२५ महिला शिक्षिका आहेत तर साधारण १२२ हे अपंग शिक्षक आहेत म्हणजे २०० ते २५० हेच धडधाकड उरतात. म्हणजे वारंवार हेच शिक्षक कोणत्याही कामाला वापरले जातात. बार्शी तालुक्यातील अपंग शिक्षकावद्दल नेहमीच तक्रारी होत असतात. हे अपंग शिक्षक सर्व कामकाजातून आरामशिर बाहेर सुटतात अशीच अवस्था थोडयाफार फरकाने राज्यातील सर्वच तालुक्यात आहे.

जे अपंग शिक्षक आहेत जे कामकाज करु शकत नाहीत ज्यांना कुवडया आहेत, एक पाय एक हात नाही, एखदे व्यंग आहे अशांना अपंग कर्मचाऱ्यांना नक्की वगळा पण त्यांच्यातील ९९ टक्के बनावट अपंगाना कामाला लावा, ते जर निवडणूकीचे कामकाज करु शकत नसतील तर कार्यरत ठिकाणी कर्तव्यावर ते काम कसे करतात ? निवडणुकीचे काम नाकारणाऱ्या अशा सर्व शिक्षकांच्या अपंगत्वाबददल माझा आक्षेप आहे. काम नाकारणारे असे हे सगळे अपंग कर्मचारी तहसील कार्यालयात बोलावून घेऊन शासनाच्या दोन तीन डॉक्टरच्या पॅनल कडून त्यांची तपासणी करुन दोन तासात हा प्रश्न निकाली काढता येईल असे आपण केल्यास राज्यात एक नवीन पॅटर्न तयार होईल आणि निवडणूक कामकाजात आपल्याला कर्मचारीही कमी पडणार नाहीत व धडधाकट पुरुषावर अन्याय पण होणार नाही याची मला खात्री आहे. वरील सर्व ठिकाणी फक्त आणि फक्त धडधाकट पुरुषच आत्याचारीत होतात. महिलांना, बोगस अपंगांना कामाची संधी नाकारुन केवळ आणि केवळ धडधाकट पुरुषांना सतत कामाचा ताण देण्याचा प्रकार होऊ शकतो तसेच प्रामाणिकपणे काम करणान्या कर्मचाऱ्यांच्या मनात प्रशासनावद्दल द्वेष निर्माण होऊ शकतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles