राज्यात सध्या दुस-याची पोर कडेवर घेऊन फिरण्यात आनंद मानणारे बरेच; राज ठाकरेचा खोचक टोला

राज्यात सध्या दुस-याची पोर कडेवर घेऊन फिरण्यात आनंद मानणारे बरेच; राज ठाकरेचा खोचक टोला



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नाशिक: आज मनसेचा 18 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे या निमित्ताने 3 दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. काळरामाचे आरती करून त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली आहे. आज भाभा नगर परिसरातील दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या मनसे मिळाव्यात आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करत आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. राज्यातील काही निवडक लोकसभा मतदारसंघ ते लढवण्याची शक्यता आहे.

सोशल मीडियाचा वापर कसा करावा यासाठी व्याख्यान ठेवणार असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. ज्यांना राजकीय महत्वकांक्षा आहे त्यांनीच यावं असेही ते म्हणाले. माझ्याही बाबतीत सोशल मीडियात काहीही टाकतात. गाडी येते, मी खाली उतरतो.. आणि बॅकग्राऊंडला रारारा..असं काहीतरी चालू असतं. हे कोणीही पाहत नाहीत. तुमच्या पोस्टमधून त्यांना काही मिळणार असेल तरच लोक पाहतात.

महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये दरवर्षी पक्षाचा वर्धापन दिन साजरा करायचा ठरवल्याचे ते म्हणाले. आज पक्षाला 18 वर्षे पूर्ण होत आहेत. तुम्हाला राजकीय इतिहास सांगावा लागेल. राजकारणात तुम्हाला टिकायच असेल तर तुम्हाला पेशन्स लागतील. इतर राजकीय पक्षांचे यश तुम्हाला आता दिसतंय.मोदींचं यश हे झटणाऱ्या कार्यकर्त्यांचं यश आहे. 1952 साली त्यांचा पक्ष स्थापन झाला. यानंतर आडवाणी, अटलजी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे अशा अनेकांनी खस्ता खाल्ल्या. त्यातून आलेलं हे यश आहे. अचानक मिळालेलं हे यश नाही.

गेल्या 18 वर्षात मी माझ भाग्य समजतो. मी चढ कमी पाहिले आणि उतारच जास्त पाहिले. पण यासर्वात तुम्ही माझ्यासोबत होतात. यश मी तुम्हाला मिळवून देणार म्हणजे देणार. पण पेशन्स लागतात. तो नसेल तर गोट्या कुठेतरी घरंगळत जाणार. मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायचीयत. दुसऱ्यांची पोर कडेवर घेऊन फिरवण्यात आनंद मिळतो. तसंल नकोय मला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles