शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेतील रचना

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय :मनातील स्वप्ने☄*
*🍂शनिवार : ०९ / ०३ /२०२४*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*मनातील स्वप्ने*

मनतील स्वप्ने
मनातच विरून गेली
प्रीत फुलण्या आधि
हृदयात कोमेजली ॥१॥

स्वप्नात तुला पाहता
माझी न मी उरले
अवचित तुला मी
सत्यात पाहु लागले ॥२॥

हृदयी माझ्या राहुनी
तूं मम चित्त चोरले
मन मंदीरी शिरूनी
मज स्वप्न दाविले ॥३॥

अंतरी माझ्या वसूनी
तूं माझे हृदय जिंकले
मनातील स्वप्ने पाहुनी
मज बेचैन केले ॥४॥

तुझे नी माझे प्रीतीचे
रंग आगळे वेगळे
आज मज ते कळले
मन झाले मोकळे-ढाकळे ॥५॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿💔✍️💔➿➿➿➿
*मनातील स्वप्ने*

रोज घुसमट मनाची
दीपकळीगत हलते
मनातील स्वप्ने माझी
हिंदोळ्यावरच झुलते

भावना फोडती हंबरडा
सुकतो आसवांचा पाणवठा
स्वप्नातील पक्षी माझे
झिजवती मनाचा उंबरठा

कधी स्पर्शातो रानवारा
तोही वाटतो शुष्क
संवेदना मरून गेल्या
झिणझिण करते मस्तिष्क

गात्रे थकून गेली
कुडी वाहते संथ
कोण्या सागराला मिळेल
कुठे आयुष्याचा अंत

एवढेच मागतो देवाला
मनातील स्वप्ने पूरे होऊ दे
जातांना परलोकी मी
बस आनंदाने जाऊ दे

*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💔✍️💔➿➿➿➿
*मनातील स्वप्ने*

प्रत्येक मनातील स्वप्ने वेगळी
आशा आकांक्षांनी भरलेली
जातात कुणाची पूर्णत्वास तर
कोणाची आरंभास भंगलेली …..

कशी मांडावी शब्दांत रे
अशा स्वप्नांची ती व्यथा
निसटलेल्या सौख्य क्षणाची
माझी प्रेरणादायी यशोगाथा…..

उभे आयुष्य सत्कर्माने
सुंदर मळ्यापरी बहरवलं
नियतीने मात्र डाव साधून
क्षणात सर्वकाही संपवलं…..

मनीच्या कल्पना स्वप्नातच
राख राख होऊन गेल्या
जाता जाता स्वप्नमनोरा
खोल खाईत गाडून गेल्या…..

अशी कुणाची ही स्वप्ने
स्वप्नातही तुटू नये वाटत
कारण एक एक स्वप्न
कितीतरी अनमोल असतं….

नयनातील अश्रू सोबतीला
न्याय मागावा तो कुणा
अंतरीच्या वेदना माझ्या
समजतील कोण्या मना….

*वर्षा मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💔✍️💔➿➿➿➿
*मनातील स्वप्ने*

मनातील स्वप्ने माझ्या
सत्यात मी उतरवली
त्यासाठी अवघी माझी
हयात ही घालवली

स्वप्ने होती विजयाची
सारी आकारा आली
आनंदाच्या झुल्यावर
विहार करू लागली

स्वप्न सत्यात उतरणे
सोपे नव्हतेच कधी
कर्मसाधना योग
जुळावा लागतो आधी

प्रयत्न असावे लागतात
सातत्यपूर्ण नेहमी
अथक परिश्रमाची
द्यावी लागते हमी

मनातील स्वप्ने सतत
होती माझ्या यशाची
अडथळ्यांवर मात करून
पराकाष्ठा केली प्रयत्नांची

आता झाली पूर्ण सारी
माझ्या मनातील स्वप्ने
दूर झाली आता माझ्या
आयुष्यातील ही विघ्ने

मनातल्या स्वप्नांचा असा
आताशा घेतो मी मागोवा
कृतार्थ झाले जीवन माझे
असाच पाठीशी रहा देवा

*श्री.पांडुरंग एकनाथ घोलप*
ता.कर्जत जि.रायगड
*©सदस्य मराठीचे शिलेदार *समूह*
➿➿➿➿💔✍️💔➿➿➿➿
*सन्मानपत्र हवे असल्यास कृपया इच्छुक विजेत्यांनीच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*मनातील स्वप्ने*

मनातील स्वप्ने माझ्या
मनातच जळून गेली
कळली नाही कधीच
नियतीची ही खेळी

मनातील स्वप्ने साकारण्यासाठी
वेचले आयुष्य दीन रात
सुखाचे सोहळे सजनार आज
अर्ध्यावरच सुटला हात

भातुकलीच्या खेळामधील
राजा आणि राणी
मनातील स्वप्नांत तल्लीन झाली
आता राणी एकटीच केविलवाणी

मनातील स्वप्न पूर्ण करण्या
करतेय मी जीवाचे रान
स्वप्नात तरी भेटावे तुम्ही
वाट बघते मी डोळयात आणून प्राण

स्वप्न मनाचे साकारीन मी सचोटीने
यातच सौख्य आता माझे
संघर्षाच्या परीक्षा देईन मी
मोठ्या कसोटीने
स्वप्न मनातील तूमच्या साकारीन मी ……..

*श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💔✍️💔➿➿➿➿
*मनातील स्वप्ने*

काही स्वप्ने होती
मनाने रंगवलेली
प्रत्यक्षात त्यातली
फार थोडी फुलली

मन उधाणवारा
धाव घेई आकाशी
सत्य मात्र वेगळे
भ्रमात होई फशी

सुख,शांती,समृद्धी
राहावी सदा जीवनी
आत्मबल सुदृढ असे
तोच जिंकेल रणी

कधी वाटे मनास
व्हावे फुलपाखरू
पण खरे त्याच्यासम
उडता येईल का भुर्र

मनातील स्वप्ने राहती
मनाच्याच गाभा-यात
प्रत्यक्ष परिस्थितीनुरूप
जगावे लागते जीवनात

हरकत नाही पाहायला
आवाक्यातील स्वप्ने
प्रयत्नाने पूर्णत्वास
जातील ती निष्ठेने

आत्मसमाधानी सदा
असावे जीवनात
मनातील स्वप्ने मग
आपोआप फुलतात

*श्रीमती सुलोचना लडवे अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💔✍️💔➿➿➿➿
*मनातील स्वप्ने*

नाही आलीत फळाला,
संघर्षाची तळमळ…
ओतलेल्या या जीवाचा,
झाला निरंतर छळ…१

केले जीवापाड प्रेम,
भावा मानले मी देव…
तुडविले स्वप्न त्यांनी,
प्रत्यक्षात येता चेव…२

सत्य न जाणता कुणी,
दिवास्वप्न पाहू लागले….
मन उधाणवाऱ्यात,
उगा ते वाहू लागले…२

येता जाग झोपेतून,
सारे विस्कटले दिसे…
सुख,शांती,समृद्धीची,
वाट लागलेली असे…३

होई कष्टी आत्मबल,
येई जीवनी निराशा…
स्वप्नातल्या सत्यताची,
स्वप्ने गुंडाळती गाशा…४

होतो स्वप्नाचा शेवट,
मनातल्या गाभा-यात…
परिस्थिती प्रतिकूल,
दिशा बदले वाऱ्यात…५

तरी मनातील स्वप्ने,
उतरेल हो सत्यात…
*सुधाकरा* बंधूप्रेम,
कधी रूजेल तथ्यात…६

*सुधाकर भगवानजी भुरके*
*आर्य नगर नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💔✍️💔➿➿➿➿
*मनातील स्वप्ने*

मनातील स्वप्ने साकारताना
रक्तबंबाळ झाले खूप पाय….
हृदयभेगांनी मन गहिवरले
दबक्या हुंदक्यांची शांतता
काळजाचं व्हायचं पाणीच
पण फुटला नाही पाझर…
नियतीला त्या बुरसटलेल्या
दातं विचकून ती हसायची
शब्दशस्त्रही पार घुसायची
म्हणायची कशी…..
कुठला आला स्वाभिमान ?
कशाचा बाळगतो अभिमान ?
ठेविले अनंते तैसेची राहावे
नशिबी जे असेल तेच पहावे
तुझी मनातली स्वप्ने रे गाढ
कशाला करतोस कष्टात वाढ ?
कुत्र्यावाणी जीवन जगायचे
डोळ्यांनी सर्व फक्त बघायचे
माणूस बनून करशील काय ?
कुणी सांगितला जालीम उपाय ?
घेताच मी नाव संविधानाचे
थरथरले अंग पिंपळपानाचे
मुखातून निघाला जयभीम नारा
दडपशाहीला दिला नाही थारा
प्रकाशवाटेने निघालो बिनधास्त
मनातली स्वप्ने साकारली रास्त

*श्री.संग्राम कुमठेकर*
*मु.पो.कुमठा (बु.)*
*ता.अहमदपूर जि.लातूर*
*सहप्रशासक/परीक्षक/संकलक*
*©️मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💔✍️💔➿➿➿➿
*मनातील स्वप्ने*

जो तो प्रयत्नशील असतो
पूर्ण करण्या मनातील स्वप्ने,
करावी प्रयत्नांची पराकाष्ठा
उगाच पाहू नयेत दिवास्वप्ने..!

ठरवलेले असते प्रत्येक्षात
कधी सुप्त,कधी होते उघड,
स्वप्न पाहणं का वाईट थोडं
कधी स्वप्नभंग,होते अवघड..!

हार म्हणजे शेवट का थोडा
विजय कोणता अंतिम नाही,
यश अपयश चालूच राहील
स्वप्नांना इथे मुळी अंत नाही..!

घरच्यांच्याच मनातील स्वप्ने
हल्ली लादली जाती मनावर,
रंगवलेले स्वप्न डांबून ठेवता
चित्त राहील कसे थाऱ्यावर..!

कधी मनातले स्वप्ने बाजूला
भडिमार चालतो देऊन डोस,
त्याचं मत वळचणीला पाडून
निर्णय घेतात पालकच ठोस..!

भंगली जरी मनातील स्वप्ने
कदापी खचून जायचे नाही,
पाठलाग करायचाच जिद्दीने
स्वप्नपूर्तीविना थांबाचं नाही..!

स्वप्नातील पंखांना बळ द्यावे
त्याचे त्याने उतुंग झेप घ्यावे,
प्रेरणा व्हावी फक्त पालकाने
मनातील स्वप्ने साकार व्हावे..!

*✍️बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💔✍️💔➿➿➿➿
*मनातील स्वप्ने*

ओसाड मनातील वाळवंटाला
पाझर केव्हा फुटणार. ?
आतुरलेल्या मनातील स्वप्ने
हे कसे पुर्ण होणार. ?

हा प्रश्न चिन्ह आजूनही
घर करून आहे हृदयात
उत्तुंग सागराच्या लाटा बघून
थोडी धडकी भरतो मनात

बघा अजमावून एकदा बळांना
वाढवा मनोबल आपले
ठेवून पुढचे ध्येय आणि जिद्द
पुर्ण करा मनातील स्वप्नाले

सुंदरशा जिवनाला समोर करून
बघा अंधारात मनातील स्वप्ने
भावनांना. ठेवून बाजूला
करा ते पुर्ण. स्वबळाने

आशा निराशा हार जीत
हा जिवनाचा आहे क्रमवार
मनावर ठेवून स्वयंम व नियंत्रण
केव्हाच मानू नका हार

पुढचे आहेत आयुष्य अवघड
तेव्हा जिवनाला बनवा सुंदर
आळसाला झटकून अंगातून
जगत रहा हौसीने आनंदाने

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💔✍️💔➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles