परीक्षा देऊनही निकाल अनुत्तीर्ण; विद्यापीठाचा अजब प्रताप

परीक्षा देऊनही निकाल अनुत्तीर्ण;
विद्यापीठाचा अजब प्रताप



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

उपस्थित विद्यार्थ्याला दाखविले गैरहजर

भंडारा : परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून परीक्षा दिली. मात्र गुणपत्रिकेत गैरहजर दाखवून अनुत्तीर्ण केल्याचा अजब प्रताप भंडारा येथील शासकीय अध्यापक विद्यालयात उघडकीस आला आहे. परीक्षा देऊनही गुणपत्रिकेत गैरहजर दाखवून अनुत्तीर्ण केल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे.

गौरीशंकर पांडुरंग वंजारी हा भंडारा येथील शासकीय अध्यापक विद्यालयात बी.एड.चे द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. गौरीशंकरने १४ डिसेंबर २०२३ रोजी थर्ड सेमिस्टरचा शारीरिक शिक्षण या विषयाचा पेपर भंडारा शहरातील आर. एम. पटेल महाविद्यालयात दिला. परीक्षेचा निकाल १ मार्च २०२४ रोजी आला. निकाल आल्यानंतर गौरीशंकर हा स्वतःच अवाक झाला. कारण, तीन विषयात चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेला गौरीशंकर शारीरिक शिक्षण या विषयात परीक्षेला अनुपस्थित असल्याचे दाखवत गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण असा उल्लेख केला होता. त्याने परीक्षा दिलेल्या महाविद्यालयातून परीक्षेच्या वेळी केंद्रावर भरून घेतलेल्या उपस्थिती आसन तक्त्याची सत्यप्रत मागविली. त्यात गौरीशंकरच्या नावाचा उल्लेख असून त्यावर त्याची स्वाक्षरी आहे. यावरून त्याने उपस्थित राहून पेपर दिला हे स्पष्ट होते, असे असतानाही गुणपत्रिकेत अनुपस्थित दाखविल्याने पुन्हा एकदा नागपूर विद्यापीठाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. याबाबत गौरीशंकरने अध्यापक महाविद्यालयाशी संपर्क साधून घडलेला प्रकार विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिला. गौरीशंकर या विद्यार्थ्या व्यतिरिक्त अध्यापक विद्यालयातील अन्य एका विद्यार्थिनीला परीक्षेला उपस्थित असतानाही अनुपस्थित दाखवून अनुत्तीर्ण केल्याचा प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

याला जबाबदार कोण ?
परीक्षा देऊन देखील गुणपत्रिकेत गैरहजर दाखवून अनुत्तीर्ण केल्याने शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या बाबतीत किती तत्पर आहे हे दिसून येते. विद्यापीठाच्या दुर्लक्षितपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले असून याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच दोशींवर कठोर कारवाही करण्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles