मोहपेकरांना प्रदीप विघ्ने सरांचा सार्थ अभिमान

मोहपेकरांना प्रदीप विघ्ने सरांचा सार्थ अभिमान



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विघ्ने सरांचा मोहपा येथे सत्कार

नागपूर: तालुका कळमेश्वर मौजे मोहपा येथे कार्यरत असलेले प्रदीप विघ्ने सर, संचालक, महात्मा फुले सर्वजनिक वाचनालय, मोहपा यांचा ‘मराठीचे शिलेदार’ बहुद्देशीय संस्था, नागपूर तर्फे मराठी भाषा गौरव दिनी बुलढाणा येथे दि २७/०२/२४ रोजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केल्याबाबत महात्मा फुले सर्वजनिक वाचनालय संस्थेचे अध्यक्ष त्र्यंबकजी राऊत सर यांचे हस्ते संस्थेतर्फे आज दि १० मार्च रोजी सत्कार करण्यात आला.

प्रदीप विघ्ने सर हे मूळचे वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील रहिवासी. सन 1992 मध्ये न.प. उच्च प्राथमिक शाळा मोहपा येथे सहशिक्षक या पदावर नियुक्ती झाली व सर मोहप्याला आले. मोहप्यात आल्यावर सर कायमचे मोहपेकर झाले. सरांचे मोहपेकरांशी जे ऋणानुबंध जुळले ते खरोखरीच कौतुकास्पद आहे. ज्याप्रमाणे जुन्या पिढीतील मराठी शाळेतील श्री गजभिये सर आपल्या एकूणच मोहपेकरात रुळले. एक वेगळा आदर्श सरांनी मोहप्यात घालून दिला, प्रेमाने समाजातील सर्वच घटकांना जिंकून घेण्यात सरांना यश आलेलं होतं. त्याचप्रमाणे श्री. विघ्ने सर त्यांचे विद्यार्थी तसेच एकूणच मोहपेकरांच्या मनावर राज्य करतात, सरांना एक वेगळं आदराचं स्थान आहे. असं मला नक्कीच वाटतं.

सर आपुलकीने सर्वांची विचारपूस करतात, प्रेमाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरून आशीर्वादाची थाप देतात्, हा अमुक अमुक माझा विद्यार्थी आहे असे चारचौघात अभिमानाने सांगतात यामुळे सरांचा विद्यार्थी पण गदगद होतो. मग विद्यार्थ्यांच्या मनात नक्कीच सरांबाबतचा आदर शतगुणित होतो. सरांना प्राप्त पुरस्कार तसेच विविध साहित्य संस्थेने त्यांच्या कार्यांची घेतलेली दखल ही मोहपेकरांसाठी फार अभिमानास्पद आहे. सरांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी सुदृढ आरोग्यासाठी, उत्तरोत्तर भरभराटीसाठी कोटी कोटी शुभेच्छा देत, महात्मा फुले सार्वजानिक वाचनालय मोहपाचे सचिव अँड.हर्षल यावलकर यांनी मनातील भावना याप्रसंगी व्यक्त केल्यात. यावेळी अध्यक्ष त्र्यंबक राऊत,सदस्य सेवाराम नेरकर,डॉ.प्रशांत महाजन,विजय वानखेडे,ग्रंथपाल जयंत आंजनकर,लिपिक मनिष आंजनकर इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles