पंतप्रधान मोदीजींनी जगात भारताची प्रतिमा उंचावली :- संजय भेंडे

पंतप्रधान मोदीजींनी जगात भारताची प्रतिमा उंचावली :- संजय भेंडेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_अर्जुनी मोर. येथे नमो चषक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न_

_१५ हजार संघांनी केली नोंदणी,५० हजार खेळाडूंचा सहभाग_

_तालुका प्रतिनिधी अर्जुनी मोर, सुरेंद्रकुमार ठवरे_

अर्जुनी मोर: भारत विकसिंनसील देश म्हणून आपली प्रतिमा उंचावत आहे. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सर्वत्र विकास झाला. भारतीय जनतेला विविध योजनांचा लाभ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीच कसर सोडली नाही. सर्वांना घरे, मोफत रासन, उज्वला गॅस यासारख्या विविध योजना सह लाभ दिला.

स्वस्त धान्य दुकानातून अंतोदय योजनेतील महिलांना मोफत साडी, दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाचे अनुदान असे कित्येक योजना भाजपा सरकारने राबविले आहेत, त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा ने ४०० पार चा नारा दिला आहे. त्यामुळे २०२९ पर्यंत मोदीच पंतप्रधान राहतील व पुढेही भाजपाची सत्ता राहील. माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आपल्या कार्यकाळात या विधानसभेसह संपूर्ण राज्यात विकासाचा झंजावत सुरू केला. आज अनेक कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यप्रणालीवर व बडोलेंच्या विश्वासावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला ही भाजपा सरकारची यशस्वी पावती आहे.

आज नमो चषक २०२४ च्या माध्यमातून अनेक खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देऊन बडोले साहेबांनी या विधानसभा क्षेत्रातील कलावंतांना खेळाडूंना एक नवी दिशा दिली. आज महाराष्ट्रासह संपूर्ण भारत विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जगात भारताची प्रतिमा उंचावली असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यकारणीचे उपाध्यक्ष संजय भेंडे यांनी केले.

भारतीय जनता युवा मोर्चा व माजी मंत्री राजकुमार बडोले आयोजित नमो चषक २०२४ क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव तथा पारितोषिक वितरण सोहळा एस एस जे कॉलेज अर्जुनी मोरगाव येथे दहा मार्च रोजी आयोजित करण्यात आला. त्यावेळी संजय भेंडे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. सर्वप्रथम थोर महापुरुष व राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, यावेळी सर्वधर्म समभावाप्रमाणे विविध गीत गायन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, यावेळी खासदार सुनील मेंढे, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी आमदार हेमंत पटले, भंडारा- गोंदिया भाजपा समन्वय वीरेंद्र अंजनकर, गटनेते लायकराम भेंडारकर, जिल्हा परिषद सदस्य रचना गहाणे, रत्नदीप दहिवले ,नामदेव कापगते, शिवनारायण पालीवाल, उमाकांत ढेंगे, विजय कापगते, महाराष्ट्राची हास्य जत्रा प्रेम अभिनेत्री शिवाली परब, प्रकाश गहाणे, लक्ष्मीकांत धानगाये, शालिनी डोंगरे, डॉ. लक्ष्मण भगत, लुनकरण चितलांगे, अशोक लंजे, विश्वजीत डोंगरे, हर्ष मोदी, निशा तोडासे, होमराज पुस्तोडे, भुमेश्वर पटले ,संगीता खोब्रागडे, छाया चव्हाण, एॅड यशुपाल उपराडे, चंद्रकला डोंगरवार, जयश्री देशमुख, पौर्णिमा ढेंगे व अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी प्रस्ताविकातून माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगताना नमो चषक महोत्सव २०२४ हा उपक्रम संपूर्ण अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात २१ जानेवारी ते १० फेब्रुवारी पर्यंत विभिन्न ठिकाणी राबविण्यात आला. यामध्ये १५ हजार संघानी सहभाग नोंदविला तर ५० हजार खेळाडूंनी व कलावंतांनी प्रत्येक्ष या चषकात भाग घेतला, विजेत्यांना पारितोषिक प्रदान करताना आपल्याला अत्यंत आनंद होत आहे, आपण २००९ पासून या विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व करीत आहोत, त्यामुळे मतदारांसी आपली नाळ जोडली आहे, आपल्या कार्यकाळात विधानसभा क्षेत्रासह महाराष्ट्राचाही आपण विकास केल्याने आपल्याला जनतेचे आशीर्वाद व समाधान लाभल्याचे माजी मंत्री बडोले यांनी सांगितले, खासदार सुनील मेंढे यांनीही मोदी सरकारनी देशात राबविलेल्या विविध योजनांची माहिती देऊन येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत चारशे पार चा नारा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सर्वांनी भाजपाला सहकार्य करण्याचे आवाहन केले, यावेळी नमो चषक २०२४ च्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.

_शिवाली परबने आणली कार्यक्रमात रंगत_

महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम शिवाली परब चे कार्यक्रम स्थळी आगमन होताच प्रचंड जल्लोषात तिचे स्वागत करण्यात आले, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रांतर्गत माजी मंत्री राजकुमार बडोले व शारदाताई बडोले व उपस्थित मान्यवरांनी शाल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन जोरदार स्वागत केले, तर एस एस जे कॉलेजच्या वतीने ही सन्मान चिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी अभिनेत्री शिवाली परब हिने आपल्या चाहत्यांना मोना डार्लिंग आणि हास्य जत्रेतील आपल्या कोहली कुटुंबाची ओळख करून दिली.

आपल्या मनोगतात उपस्थित प्रेक्षकांसी संवाद साधताना तसेच माजी मंत्री बडोले यांनी सामाजिक मंत्री असताना लंडनमधील बाबासाहेबांच्या घरा करिता घेतलेल्या परिश्रमाची आठवण करून दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील माजी मंत्री राजकुमार बडोले मित्रपरिवार व भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles