पोखर डोंगरी भोलेनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

पोखर डोंगरी भोलेनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_घटस्थापना, महाशिवात्री पुजा, महाप्रसाद व काला वितरण_

_प्रतिनिधी, परसटोला केशोरी, भाग्यवान डोंगरे_

अर्जुनी मोरगाव: तालुक्यात ऐतिहासिक तीर्थक्षेत्र प्रतापगड आहे .तिथे महाशिवरात्रीच्या पर्वावर मोठी यात्रा भरते. लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. त्याचप्रमाणे तालुक्यात बरेच असे धार्मिक स्थळ असून तिथेही महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविक भोलेनाथाचे दर्शन घेऊन आपली मनोकामना पूर्ण करतात. असेच एक तीर्थक्षेत्र केशोरी( परसटोला ) जवळील पोखर डोंगरी देवस्थान महादेव पहाडी असून तिथे महाशिवरात्रीला हजारो शिवभक्तांनी हजेरी लावून आपली मनोकामना पूर्ण केली.

जय पोकर डोंगरी राघोबा देवस्थान महादेव पहाडी समिती परसटोला, अरततोंडी, धमदीटोला यांचे वतीने महाशिवरात्री पर्वावर पोखर डोंगरी देवस्थान पहाडी परसटोला अरततोंडी तालुका ( अर्जुनी मोरगाव ) येथे आठ व नऊ मार्चला भव्य महाशिवरात्री पूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ८ मार्चला सकाळी सात वाजता घटस्थापना व भगवान भोलेनाथाची महाशिवरात्रि पूजा करण्यात आली, 09 मार्चला महाप्रसाद व कालावितरण कार्यक्रम घेण्यात आला.

महाप्रसाद वितरणामध्ये जंगल कामगार संस्था तिरोडाचे एन. टी. चौधरी, जंगल कामगार संस्था गुढरीचे वाय. एन. बघेले, ईडदा संस्थाचे शहारे साहेब, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक यशवंत मेश्राम ,सचिव प्रतिमा मेश्राम यांचे सहयोगाने करण्यात आले, पूजापाठ व महाप्रसाद वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगरसेवक तथा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस गोंदिया दाणेश साखरे, तर उद्घाटक म्हणून गोंदिया जिल्हा परिषद चे उपाध्यक्ष यशवंत गणवीर यांचे हस्ते झाले, व अतीथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांधे, माजी सभापती प्रकाश गहाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका युवा अध्यक्ष योगेश नाकाडे, पं. स. सदस्य फुलचंद बागडेरिया, सरपंच रामुजी कुंभरे, ग्रामपंचायत सदस्य प्रीतम रामटेके, उपसरपंच ज्ञानेश्वर गेडाम, पोलीस पाटील अनमोल, विकास रामटेके, राजू कांबळे, आनंदराव कोवे, युवराज गहाणे, पंढरी कोवे, प्रल्हाद पंधरे, एम. टी. पवनकर, एस. पी. फुंडे, आर. वाय. मेश्राम, मिथुन तागडे, के. टी. मेश्राम, युवराज गहाणे, भागवत सोनकुसरे, तुलाराम नेवारे, रवींद्र लांजेवार, किशोर शहारे, भाग्यवान डोंगरे व अन्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

पोखर डोंगरी महादेव पहाडी देवस्थान फार पुरातन असून या तीर्थक्षेत्राचा फार मोठा इतिहास आहे. आज हे धार्मिक स्थळ हजारो भक्ताचे अशास्थान ठरत आहे. यावर्षी महाशिवरात्री पर्वावर आठ व नऊ मार्च रोजी हजारो भाविकांनी भोलेनाथाचे दर्शन घेऊन आपली मनोकामना पूर्ण केली असून महाप्रसादाचाही लाभ घेतला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles