प्रतापगड येथे वंचित बहुजन आघाडी तर्फे महाप्रसादाचे वाटप

प्रतापगड येथे वंचित बहुजन आघाडी तर्फे महाप्रसादाचे वाटप



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

तालुका प्रतिनिधी, अर्जुनी मोर सुरेंद्रकुमार ठवरे

अर्जुनी मोर: तालुक्यातील प्रतापगड येथे महाशिवरात्री निमित्ताने दरवर्षी भव्य यात्रा भरते. यात्रेत जिल्हाभरातून लाखोंच्या संख्येत भाविक सहभागी होऊन महादेवाच्या दर्शनासाठी येतात अर्जुनी मोरगांव तालुक्यातील प्रतापगड येथील महाशिवरात्रीची यात्रा विदर्भामध्ये प्रसिद्ध असून जिल्हाभरातून तसेच लगतच्या भंडारा जिल्ह्यातूनही भाविक प्रतापगड येथील यात्रेत सहभागी होतात.

यामध्ये कित्येक यात्री प्रवासी वाहनांनी प्रतापगड गाठतात तर कित्येक भाविक स्वतःच्या वाहनांनी प्रतापगड गाठून महादेवाचे दर्शन घेत असतात आणि त्यानिमित्ताने म्हणून दि.१० मार्च ला प्रतापगडाच्या शिवगडावरती जातांना गडाच्या पायथ्याशी असलेल्या शिवमंदिरात शिवशंकराच्या मुर्तीचे पुजन करून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाप्रसादिचे वाटप येणाऱ्या भाविक भक्तांना करण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ता नितेशजी बोरकर, किशोरजी तागडे, कैलास ईश्कापे, महादेव सलामे, दिपक जनबंधू, दिपेंद्र ऊके, नेहाल कांबळे, रोहित रामटेके, सुरज रंगारी, हर्षपाल लोणारे, विश्वरत्न रामटेके, वैभव कावळे, राहुल रोकडे, चेतन निर्वाण, प्रशांत शेंडे, सुनील गिर्हेपुंजे, संदीप नंदागवळी, श्रीकांत वलथरे, सुरेश मडावी आदी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles