समाजसेवेने झपाटलेला निस्वार्थ ‘नितेश’

समाजसेवेने झपाटलेला निस्वार्थ ‘नितेश’पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

कोरोना योद्धा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

तालुका प्रतिनिधी अर्जुनी मोर, सुरेंद्रकुमार ठवरे

अर्जुनी मोर: कोरोना काळात सर्व जग थांबले.प्रत्येक व्य क्ती केवळ स्वतःसाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या रीतीनेच वागले. कित्येकांनी संधीचे सोने करीत महामारीचा आर्थिक लाभ घेतला.मात्र अशाही विपरीत परिस्थितीत स्वतःला,कुटुंबाला विसरून समाजाचे आपण काही देणं लागतो ही बाब लक्षात घेत महामारीला न घाबरता योद्धाप्रमाणे समाजाला मदत केली.त्या काळात काही प्रसिद्धीच्या झोतात आले तर अनेक हिरे पडद्यामागे राहिले.मात्र म्हणतात ना उत्तम कर्माला निसर्ग साथ देतो.अशाच एका पडद्याआडच्या हिऱ्याचा शोध नागपूरच्या मराठीचे शिलेदार संस्थेने घेत ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरव केला. समाजसेवेने झपाटलेल्या त्या हिऱ्याचे नाव आहे नितेश.

अर्जुनी मोरगाव येथील नितेश क्षीरसागर हे एक व्यवसायिक आहेत.समता, बंधुता,धर्मनिरपेक्षता, उदारता, दयाभाव व माणुसकी या तत्त्वांना स्वीकारून समाजसेवेत हरपणारे नितेश. कोरोना काळात डॉक्टर,पोलीस विविध समाजसेवी हे देवदूत बनले. विशेषतः व्यवसायातून समाजसेवा हे उदाहरण दुर्लभच असेल. या देवदूतांच्या सेवेसाठी नितेशने प्रत्यक्ष तालुका भर पाकीट बंद खाद्य,शरबत, शीतपेय,पाणी स्वतः निस्वार्थपणे वितरित केले.प्रवासी मजुरांना जेवण, पाण्याची व्यवस्था केली.या महामारीतून त्यांना समाजसेवेची ओढ लागली. आजही गुप्त पद्धतीने गरजूंना आर्थिक मदत,कुठेही वाच्यता न करता सतपात्री व चोखंदळ दान हा त्यांच्या मूळ स्वभाव बनला.

पद,प्रतिष्ठा,प्रसिद्धीच्या मागे न धावता केवळ सत्कार्य करत राहणे हा त्यांच्या मूळ स्वभाव.परिसरातील कुठल्याही धार्मिक,सामाजिक कार्यक्रमांमध्ये अग्रेसर असणे. परोपकार,दयाभावाची पेटलेली पणती घेऊन नितेशचा प्रवास निरंतर सुरू आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेत नागपूर येथील मराठीचे शिलेदार बहुद्देशीय संस्थेने सन 2024 चा जीवनगौरव पुरस्कार देऊन एका भव्य दिव्य कार्यक्रमात सन्मान केला. समाजसेवेने झपाटलेल्या या अवलीयास पुढील कार्यासाठी शुभेच्छा.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles