प्रतिभा आणि प्रतिमा; शर्मिला देशमुख – घुमरे

प्रतिभा आणि प्रतिमापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आता हे काय ? प्रतिभा आणि प्रतिमा ? होय तर, एक नवा अनुभव. काही लोक हे निसर्गतःच अनमोल गुंणाचा ठेवा घेऊन आलेले असतात. निसर्गाचा जणू वरदहस्तच त्यांच्यावर. काहीही जमते अगदी दिसण्यापासून ते वागण्या बोलण्यापासून ते गुणांपर्यंत. पण ते निर्सगाचे वरदान आणि त्या व्यक्तीचे कष्टही असतात बरं का ! आपल्या गुणांमध्ये वाढ व्हावी, प्रगल्भता यावी म्हणून या व्यक्ती प्रामाणिक प्रयत्न करत असतात. यांच्यामध्ये नसतो कोणताच अहंपणा नसतो गर्व. कधी कुठे संधी मिळालीच, तर सूर्य तेजाप्रमाणे चमकतात. पण संधीच्या पाठीमागे या व्यक्ती कधीच धावताना दिसत नाहीत. आपण एखादी गोष्ट समोरच्या व्यक्तीपेक्षा चांगली करू शकत असलो, तरी या व्यक्तीच्या मनाला तो तुलनात्मक विचार स्पर्श करत नाही कारण ती मनाने निर्मळ असतात. दुस-याचे कौतुक करायलाही आवडते यांना. कोणी हाताने सूर्य झाकला म्हणून त्याचे तेज रोखून दाखवू शकेल का ? नाही ना ? या व्यक्तीचेही तसेच स्वतःची प्रतिभा वाढवायचा हे प्रयत्न करतील पण समाजात प्रतिमाच हवी असा यांचा अट्टहास पहायला मिळत नाही . आता हा त्यांचा दोष की चांगुलपणा माहित नाही.

समाजाचे वास्तव स्वरूप पहिले, तर समाजात जास्तीत जास्त स्पर्धा करताना लोक दिसतात. मी कुठे कमी ? मी का नाही ? मला पण येत …. मी पण करू शकतो … माझी पण प्रतिमा हवी आणि प्रतिभा ? प्रतिभा मिळतेच कि हळू हळू ती सवयीने प्राप्त होते , तिला कसे हि मिळवू पण माझी प्रतिमा निर्माण व्हायला हवी …हे उथळ पाणी फार खळ खळ वाहत असते अन ती शांततेची प्रतिभा शांत समुद्राप्रमाणे शांतच असते.मी एका ट्रेनींग मध्ये एका शिक्षिकेला आनुभवले कदाचित शास्त्रीय संगीताचे -गायन क्लास चालू असावेत . कलागुणांना अवकाश म्हणून काही वेळ मिळायचा ,या शिक्षिका सर्वात आधी उठणार . पहिल्या दिवशी दाद मिळाली नवख्या म्हणून पण त्यांची चिकाटी , बापरे ! या उठल्या कि शिक्षकांनी टाळ्या सुरु करायच्या आता का ते समजण्याइतके वाचक हुशार आहेतच पण तरीही त्या खाली बसायचे नाव घेत नसत. तब्बल आठ दिवस मी तो प्रसंग अनुभवला काय ते प्रतिमेचे वेड ! काय ती चिकाटी ! बळेच समाजाच्या गळी उतरवण्याची जिद्द ,कोणी ऐको ना ऐको किंवा उठून जावो यांनी गाणे बंद केले नाही . प्रणाम त्या मातेला …..!!

पावला पावलावर वेगवेगळी माणसं पहायला मिळतात . बऱ्याच जणांना स्वतः चे कौतुक ऐकून घ्यायची फार हौस असते त्यासाठी त्यांची चाललेली धडपड पाहून त्यांच्या कौतुकाचे हि मला कौतुक करावे वाटते . दुसऱ्याची प्रतिभा मारून मुटकून , चोरून मारून ती माझीच असे दाखवण्याचे हि काही जणांचे प्रयत्न असतात,त्यांचे हि कौतुकच !काही माणसे अशी असतात कि समोर गर्दी दिसली कि यांची बोटे माईक साठी वळ्वळतात . ती संधी मलाच मिळाली पाहिजे असा यांचा अट्टाहास त्यांचे तर नेहंमीच कौतुक !काही बिचारे शांत , सयंमी असतात ,आग्रह केला तरच उठणार , पाहणाऱ्याला वाटेल हा काय बोलणार आता ? बळेच उठवलय …पण वास्तवात अश्या व्यक्ती जेव्हा बोलतात ,गर्जतात ,सभा गाजवतात तेव्हा “आ “वासून पहाण्या शिवाय पर्याय नसतो. खरे पहिले तर व्यक्ती तितक्या प्रवृत्ती कोणाला प्रतिभा मिळवायची असते तर कोणाला प्रतिमा . प्रश्न असा आहे कि ,प्रतिभा असणारे प्रतिमेच्या मागे लागत नाहीत आणि प्रतिमा असणाऱ्याकडे प्रतिभा असतेच , मग हा सर्व गोंधळ कशासाठी फक्त सामाजिक प्रतिष्ठा , मीपणा , अहंमपणा , मी कमी नाही हे दाखवण्यासाठी कि आणखी काही हा मला न सुटलेला प्रश्न …
हे तमा ……
सूर्यतेजास तू ना झाकळणार
पसरव कितीही अंधकार
कर हल्ला शब्दांचा,
वादळांचा
सूर्य नव्या तेजाने पुन्हा
चमकणार ….
शेवटी काय प्रतिभा आणि प्रतिमा एकाच नाण्याच्या दोन बाजू ,प्रतिभे सोबत प्रतिमा चालणारच कोणी कितीही काहीही करा … बस इतकेच.

शर्मिला देशमुख – घुमरे
ता.केज, जि.बीड
========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles