कर्तबगार स्त्री..कुसुम पाटील

कर्तबगार स्त्री..



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मान सन्मान तिच्याच अंगी
शोभतो कुलाचा संहार स्त्रित्वाचा
जागर माय ममतेचा संसार
सुखकर घडविले नित्याचा

आधी देवता लक्ष्मी सरस्वती
ज्ञानदेवचा असे शक्तिमान
सन्मान करून कर्तबगार स्त्रीचा
सूर्याहून तेजो मय प्रकाशमान

घेतली यशाची उंच भरारी
कार्यकर्तुत्वाने प्रत्येक क्षेत्रात
धरणी असो की आकाश
केलेय तीन यश पादाक्रांत

संविधानाने दिले तिला
पुरुषाच्या बरोबरीचे स्थान
तरी ही घर असो की समाज
तिला मिळतो दुय्यमच मान

जडणघडणीच्या काळात
आधार तुझ्या अस्तित्वाचा
संकटावरी मात करूनीया
करूया सन्मान स्त्रीत्वाचा

मुक्त जरी कायद्याने
आजही ही आहे ती बंधनात
कित्येकीचा श्वास कोंडतोय
चार भिंतीच्या आत

आदर्श असे घराण्याचा
संस्काराचा मेळ संयमाचा
रचला पाया मेहनतीचा
करूया सन्मान कर्तबगार स्त्रीचा

कुसुम पाटील कसबा बावडा
कोल्हापूर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles