बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील रचना

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट दहा🌈🌈🌈*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : मायेचा ओलावा*🥀
*🍂बुधवार : १३ / मार्च /२०२४*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*मायेचा ओलावा*

प्रेम आणि मैत्रीच्या नात्यात
असावा गोड मायेचा ओलावा
विश्वासाच्या प्रामाणिक नात्यात
नसावा कुठलाच दिखावा.

*सौ.इंदु मुडे, ब्रम्हपुरी/ चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿❣️🌸❣️➿➿➿➿
*मायेचा ओलावा*

देवाने नेलं ओढून आमच्या पासून तिला
केला माय लेकरां मध्ये निर्माण दुरावा..
अजूनही कधीतरी स्पर्श तिचा होता
जाणवतो प्रेमाने भरलेला मायेचा ओलावा..

*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿❣️🌸❣️➿➿➿➿
*मायेचा ओलावा*

*आईचा मायेचा ओलावा*
*कायमच घराला बांधतो,*
*नकळत घराच्या सोबत*
*प्रत्येक नात्याला सांधतो.*

*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
४,शारदानगर,चोपडा
ता.चोपडा, जि.जळगांव
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿❣️🌸❣️➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी सभासद नोंदणी करूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*मायेचा ओलावा*

साखरेपेक्षा गोड
मायेचा गोडावा
मायेमध्ये असते
प्रेमाचा ओलावा

*सौ रजनी शिरीष कामडी*
नागभीड, चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿❣️🌸❣️➿➿➿➿
*मायेचा ओलावा*

ढगाळ आकाशाला
हवेची फुंकर
मायेच्या ओलाव्याला
नाही कसले अंतर

*वर्षा मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿❣️🌸❣️➿➿➿➿
*मायेचा ओलावा*

मायेचा ओलावा
मनास रिझवितो
वाळवंटी जीवनात
हिरवळ फुलवतो

*सौ. वनिता महादेव लिचडे*
त.पवनी,जि.भंडारा
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿❣️🌸❣️➿➿➿➿
*मायेचा ओलावा*

मायेचा ओलावा
शोधू कुठे मी आई ?
इतक्यात जाण्याची
कां ग केली तू घाई ?

*डॉ.सौ.मंजूषा साखरकर ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿❣️🌸❣️➿➿➿➿
*मायेचा ओलावा*

*मायेचा ओलावा जिथे लाभतो*
*तिथेच मन रमतं*॥॥
*जिथे मिळते तिरस्कार अन उपेक्षा*
*तिथे मन दमतं*॥॥॥॥

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿❣️🌸❣️➿➿➿➿
*मायेचा ओलावा*

*पाठी असेल मायेचा ओलावा*
*सवे जिद्द असेल मनी*
*तोच घेईल उंच भरारी*
*त्यांस रोखू शकेल ना कुणी*

*श्री. राजेश लक्ष्मीकांत धात्रक, ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर*
*©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿❣️🌸❣️➿➿➿➿
*मायेचा ओलावा*

नकोत नाती दुरावलेली
असावा जवळीक नात्यात
असती मायेचा ओलावा त्यात
प्रेम मिळती सहवासात

*सौ पुष्पा डोनीवार*
बाबुपेठ वार्ड चंद्रपूर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿❣️🌸❣️➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles