काव्यभूषण पुरस्कार प्राप्त ‘कवयित्री उर्मिला राऊत’ यांचा सत्कार

काव्यभूषण पुरस्कार प्राप्त ‘कवयित्री उर्मिला राऊत’ यांचा सत्कार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर व यशवंतराव चव्हाण सेंटर, केंद्र बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जागतिक मराठी भाषा गौरव दिनी’ कवयित्री उर्मिला राऊत, नागपूर यांना राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला.

ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवशी ‘जागर मराठीचा’ हा कार्यक्रमात मंगळवार, दि.२७ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट इमारत’, ए. आर. डी. सिनेमा हॉलच्या मागे, मलकापूर रोड, बुलढाणा येथे मोठ्या उत्साहात व थाटात संपन्न झाला.

सौ. उर्मिला गजाननराव राऊत या सहशिक्षिका म्हणून, जि. प. उ.प्रा. शा. गोंडखैरी (जुनी) प.स. कळमेश्वर, जि. प.नागपूर. येथे कार्यरत असून त्या सातत्याने विविध विषयावर काव्यलेखन करीत असतात. मराठीचे शिलेदार संस्थेतर्फे त्यांना राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्कार पाठविण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व जागर मराठीचा विशेषांक असे पुरस्काराचे स्वरूप असून, त्यांची मुलगी डॉ.रसिका गजाननराव राऊत यांनी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles